World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटरवर फिदा झाली प्रसिद्ध अभिनेत्री, फोटोशी केलं लग्न

Last Updated:

ट्रेविस हेडची खेळी पाहून बंगाली मॉडेल आणि अभिनेत्री हेमोश्री भद्रा ही त्याच्यावर भलतीच फिदा झाली असून तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओची बरीच चर्चा रंगली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटरवर फिदा झाली प्रसिद्ध अभिनेत्री
ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटरवर फिदा झाली प्रसिद्ध अभिनेत्री
मुंबई, 21 नोव्हेंबर : भारतात पार पडलेल्या आयसीसी वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करून सहाव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले. ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने टीम इंडियावर विजय मिळवला असून यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रेविस हेड याने दणदणीत शतक ठोकले. ट्रेविस हेडची ही खेळी पाहून बंगाली मॉडेल आणि अभिनेत्री हेमोश्री भद्रा ही त्याच्यावर भलतीच फिदा झाली असून तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओची बरीच चर्चा रंगली आहे.
अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या वर्ल्ड कप फायनल सामन्यात टीम इंडियाचा पराभव करण्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेविस हेड याने मुख्य भूमिका बजावली. ट्रेविस हेडने 120 बॉलमध्ये केलेल्या 137 धावांमुळे ऑस्ट्रेलिया टीमला भारताने दिलेलं आव्हान 43 ओव्हरमध्ये पूर्ण करणं शक्य झालं. या जबरदस्त खेळीमुळे ट्रेविस हेड याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.
advertisement
advertisement
ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बंगाली मॉडेल आणि अभिनेत्री हेमोश्री भद्रा हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून त्यात म्हणाली, " मी ट्रेविस हेडच्या नावाचे कुंकू माझ्या भांगेत भरले आहे. मी जेवढे याच्या विषयी विचार करते माझे गाल लाजून लाल होतात. माझ्या सुंदर हाताने मी याचा फोटो पकडला आहे. हा माझा पती व्हावा अशी माझी इच्छा आहे'. हेमोश्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटरवर फिदा झाली प्रसिद्ध अभिनेत्री, फोटोशी केलं लग्न
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement