Team India : बॅटिंग नाही तर बॉलिंगमध्ये चालली आयुष म्हात्रेची जादू, एकट्याने फिरवली वर्ल्ड कपची मॅच!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने झिम्बाब्वेचा तब्बल 204 रननी पराभव केला आहे. भारताने दिलेलं 353 रनचं आव्हान पार करताना झिम्बाब्वेचा 148 रनवर ऑलआऊट झाला आहे.
बुलावायो : अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने झिम्बाब्वेचा तब्बल 204 रननी पराभव केला आहे. भारताने दिलेलं 353 रनचं आव्हान पार करताना झिम्बाब्वेचा 148 रनवर ऑलआऊट झाला आहे. बॅटिंगमध्ये अपयशी ठरलेल्या आयुष म्हात्रेने त्याच्या बॉलिंगमध्ये जादू दाखवून भारताला विजय मिळवून दिला आहे. आयुष म्हात्रेने 4 ओव्हरमध्ये फक्त 14 रन देऊन 3 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय उद्धव मोहनलाही 3 विकेट घेण्यात यश आलं. आरएस अंबरीश 2 आणि हेनिल पटेल, खिलान पटेल यांना 1-1 विकेट मिळाली. झिम्बाब्वेकडून लीरॉय चिवाउलाने सर्वाधिक 62 रनची खेळी केली.
या सामन्यात झिम्बाब्वेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 352 रन केले. विहान मल्होत्राने नाबाद 109 रनची खेळी केली, तर अभिज्ञान कुंडूने 61 आणि वैभव सूर्यवंशीने 52 रन केले. शतकी खेळीबद्दल विहान मल्होत्राला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. विहान मल्होत्राने 107 बॉलमध्ये 7 फोरच्या मदतीने नाबाद 109 रन केले. तर वैभव सूर्यवंशीने त्याच्या 30 बॉलच्या खेळीमध्ये 4 फोर आणि 4 सिक्स लगावल्या. 130 रनवरच भारताने 4 विकेट गमावल्या होत्या, त्यामुळे टीम अडचणीत सापडली होती, पण विहान मल्होत्रा आणि अभिज्ञान कुंडू यांनी भारताला अडचणीतून बाहेर काढत, मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचवलं.
advertisement
झिम्बाब्वेविरुद्धचा टीम इंडियाचा सुपर सिक्समधला हा पहिल्या सामन्यातला पहिला विजय आहे. याआधी ग्रुप स्टेजमध्ये भारताने 3 पैकी 3 सामने जिंकले होते. सुपर सिक्स स्टेजमध्ये भारताच्या ग्रुपमध्ये झिम्बाब्वेसह इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड या टीम आहेत. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पुढचा सामना 1 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 9:45 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : बॅटिंग नाही तर बॉलिंगमध्ये चालली आयुष म्हात्रेची जादू, एकट्याने फिरवली वर्ल्ड कपची मॅच!









