Sarfaraz Khan : 6,4,6,4,6,4... अभिषेक दुसऱ्यांसोबत करतो तेच त्याच्यासोबत झालं, सरफराजने एका ओव्हरमध्येच तारे दाखवले!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
विजय हजारे ट्रॉफीमध्ये सरफराज खानची बॅट पुन्हा तळपली आहे. सरफराजने अभिषेक शर्माच्या एका ओव्हरमध्ये 30 रन ठोकल्या आहेत.
जयपूर : विजय हजारे ट्रॉफीमध्ये टीम इंडियात कमबॅक करण्याचा प्रयत्न करणारे सगळे खेळाडू धमाका करत आहेत. मुंबईचा सरफराज खानही त्यातलाच एक आहे. 2024 साली भारताकडून शेवटची मॅच खेळलेल्या सरफराज खानची बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. 8 जानेवारीला पंजाबविरुद्धच्या सामन्यात सरफराज खानने 20 बॉलमध्ये 62 रनची वादळी खेळी केली.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये सरफराजची कामगिरी
पंजाबविरुद्ध- 20 बॉलमध्ये 62 रन
हिमाचल प्रदेशविरुद्ध- 10 बॉलमध्ये 21 रन
गोव्याविरुद्ध- 75 बॉलमध्ये 157 रन
छत्तीसगडविरुद्ध- बॅटिंगची संधी नाही
उत्तराखंडविरुद्ध- 49 बॉलमध्ये 55 रन
सिक्कीमविरुद्ध- 5 बॉलमध्ये 8 रन
Sarfraaz Khan in SMAT & VHT
In SMAT - 73(22), 64(25), 5(4), 28(15), 7*(9), 52(40) & 100*(47).
In Vijay Hazare - 62(20), 21(10), 157*(75), 55(49), 8*(5).
CSK buy Sarfaraz Khan to 75 Lakh in IPL 26..!! pic.twitter.com/zeP4ph5wy1
— VIKAS (@Vikas662005) January 8, 2026
advertisement
अभिषेकच्या एका ओव्हरमध्ये 30 रन
सरफराज खानने पंजाबविरुद्ध 310 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत 7 फोर आणि 6 सिक्स मारले. सरफराजने त्याच्या या खेळीमध्ये अभिषेक शर्माच्या एका ओव्हरमध्ये 30 रन ठोकल्या. टीम इंडियाचा विस्फोटक बॅटर असलेला अभिषेक शर्मा डावखुरी स्पिन बॉलिंगही करतो. सरफराजने अभिषेकच्या ओव्हरमध्ये 6, 4, 6, 4, 6, 4 अशा रन काढल्या.
advertisement
एक रनने मुंबईचा पराभव
पहिले बॅटिंग करताना पंजाबने 45.1 ओव्हरमध्ये 216 रन केले. अनमोलप्रीत सिंगने 75 बॉलमध्ये 57 रनची खेळी केली, यानंतर रमणदीप सिंगने 74 बॉलमध्ये 72 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या अंगकृष रघुवंशीने 32 बॉलमध्ये 23 रन आणि मुशीर खानने 22 बॉलमध्ये 21 रन करून मुंबईला चांगली सुरूवात करून दिली. यानंतर तिसऱ्या नंबरवर बॅटिंगला आलेल्या सरफराजने 20 बॉलमध्ये 62 रनची खेळी केली. श्रेयस अय्यरने 34 बॉलमध्ये 45 रन केले. सूर्यकुमार यादव (12 बॉल 15 रन), शिवम दुबे (6 बॉल 12 रन), हार्दिक तमोरे (15 बॉल 15 रन) यांना प्रभाव पाडता आला नाही. मुंबईचा 26.2 ओव्हरमध्ये 215 रनवर ऑलआऊट झाला त्यामुळे त्यांना 1 रनने पराभव पत्करावा लागला.
view commentsLocation :
Jaipur,Rajasthan
First Published :
Jan 08, 2026 5:57 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sarfaraz Khan : 6,4,6,4,6,4... अभिषेक दुसऱ्यांसोबत करतो तेच त्याच्यासोबत झालं, सरफराजने एका ओव्हरमध्येच तारे दाखवले!









