advertisement

Paris Olympics: ऑलिम्पिक विजेत्यांना मेडलसोबत मिळणाऱ्या बॉक्समध्ये नक्की काय आहे?

Last Updated:

गळ्यात गोल्ड, सिल्व्हर किंवा ब्रॉन्झ मेडल पडावं यासाठी ते प्रचंड कष्ट करतात. कारण खेळाडूंसाठी ऑलिम्पिक मेडल हे सर्वोच्च बक्षीस असतं.

News18
News18
ऑलिम्पिकचं आयोजन दर चार वर्षांनी केलं जातं. त्यामुळेच ही चार वर्ष जगभरातील खेळाडू ऑलिम्पिक पोडियमवर पोहोचण्यासाठी जीव तोडून मेहनत करत असतात. त्यांच्या गळ्यात गोल्ड, सिल्व्हर किंवा ब्रॉन्झ मेडल पडावं यासाठी ते प्रचंड कष्ट करतात. कारण खेळाडूंसाठी ऑलिम्पिक मेडल हे सर्वोच्च बक्षीस असतं.
तुम्ही सध्या पॅरिसमध्ये होत असलेलं 2024 चं ऑलिम्पिक बघत असाल तर प्रत्येक क्रीडा प्रकारातील सर्वोत्तम तीन ॲथलिट्सना पोडियमवर पोहोचल्यानंतर त्यांच्या मेडलबरोबरच एक गोल्डन बॉक्सही दिला जात आहे. या बॉक्समध्ये काही इतर पुरस्कार आहेत. केवळ सर्वोत्कृष्ट खेळाडूंनाच ते दिले जातात.
विजेत्या खेळाडूंवर अनेक बक्षिसांचा वर्षाव होणं हे साहजिकच. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळांसाठी आयकॉनिक पोस्टर्स सादर करुन याआधी झालेल्या ऑलिम्पिकच्या तुलनेत वेगळेपण राखले आहे. प्रसिद्ध पर्शियन कलाकार उगो गॅटोनी यांनी ही पोस्टर्स तयार केली आहेत. गॅटोनी हे जगभर त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. त्यांचं काम कल्पना आणि अतिवास्तववाद यांचा मिलाफ असल्याचं दिसतं.
advertisement
ही पोस्टर्स तयार करण्यासाठी त्यांनी दोन हजार तासांपेक्षा जास्त वेळ घेतला आहे. विजेत्यांना पोस्टर भेट देण्याच्या कृतीमुळे यंदाच्या ऑलिम्पिक आयोजनाला एक विशेष उंची प्राप्त झाली आहे. 2020 मध्ये टोकिओ ऑलिम्पिकमध्ये विजेत्यांना पिवळ्या आणि निळ्या फुलांचे गुच्छ दिले जात होते. 2016 मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये जगातील खास व्यक्तींची मॉडेल्स देण्यात आली होती.
advertisement
यंदा विजेत्यांना दिलं जाणारं कलात्मक पोस्टर रुपातील बक्षीस हे पॅरिस शहराला लाभलेला सांस्कृतिक आणि कलात्मक वारश्याला साजेसं आहे.
मात्र, विजेत्यांना मेडलच्या बरोबरीने मिळणारं हे एकमेव बक्षीस नाही. मेडल, पोस्टर बरोबरच ऑलिम्पिक शुभंकरचं स्टफ टॉयही खेळाडूंना देण्यात येत आहे. सहसा एखादा प्राणी हा ऑलिम्पिक शुभंकर असतो. यंदा मात्र फ्रान्सच्या स्वातंत्र्याचं प्रतीक असलेली तिथली खास फ्रीझियन कॅप शुभंकर आहे. या स्पर्धेसाठी शुभंकराची स्पेशल एडिशन बनवण्यासाठी डोडो एट कॉम्पेनी या ग्रुपबरोबर करार करण्यात आला होता.
advertisement
शुभंकरच्या स्पेशल एडिशनमध्ये पदक विजेत्यांच्या
कामगिरीचं प्रतिबिंब आहे. पदकांचे रंग शुभंकरच्या पोटावर शिवून दर्शवण्यात आले आहेत. त्याचे बुट रंगवण्यासाठी तसंच त्याच्या पाठीवर ‘ब्राव्हो’ लिहिण्यासाठी वापरण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पॅरालिम्पिक विजेत्यांसाठी बनवलेल्या शुभंकरवर खास अंध खेळाडूंसाठी ‘ब्राव्हो’ हा शब्द ब्रेल लिपीत लिहिण्यात आला आहे. असं असलं तरी ऑलिम्पिक असो की पॅरालिम्पिक, खेळाडूंसाठी आपल्या देशाचं नाव पदक तालिकेत पाहणं हीच खरी प्रेरणा असतं हे निश्चित.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Paris Olympics: ऑलिम्पिक विजेत्यांना मेडलसोबत मिळणाऱ्या बॉक्समध्ये नक्की काय आहे?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement