IND vs AUS 2nd ODI : दुसऱ्या वनडे मॅचपूर्वी रोहित शर्माने का घेतली यशस्वी जयस्वालची बॅट? पाहा Video

Last Updated:

Rohit sharma took yashasvi jaiswals bat : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वनडे सामना अॅडलेटच्या मैदानावर होणार आहे. अशातच आता रोहित शर्माचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Why rohit sharma took yashasvi jaiswals bat
Why rohit sharma took yashasvi jaiswals bat
India vs Australia 2nd ODI, Adelaide : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 ने पिछाडीवर असलेला भारतीय संघ अ‍ॅडलेडमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करीत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना गुरुवारी अ‍ॅडलेड ओव्हल येथे खेळला जाईल. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. भारतीय संघ अ‍ॅडलेडमध्ये विजय मिळवून मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल. संघ अ‍ॅडलेडमध्ये पोहोचला आहे आणि मंगळवारी खेळाडूंनी नेटमध्ये जोरदार सराव केला. अशातच रोहित शर्माच्या एका कृतीने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

 एक तास सराव आणि टायमिंगवर लक्ष

अॅडलेडमध्ये दोन्ही वरिष्ठ फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. रोहित आणि विराटने नेट प्रॅक्टिसमध्ये खूप मेहनत घेतली. कर्णधार रोहितने सुमारे एक तास फलंदाजी केली, त्याच्या स्ट्रोक प्ले आणि टायमिंगवर लक्ष केंद्रित केलं. त्याआधी रोहित शर्माने यशस्वी जयस्वाल याच्याकडून बॅट घेतल्याचं पहायला मिळालं. रोहित शर्मा यशस्वी जयस्वालच्या बॅटने सराव करतानाचा त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement

रोहित शर्माला वाटेत जयस्वाल भेटला अन्...

प्रदीर्घ विश्रांतीनंतर मैदानात परतलेला कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांना पर्थमध्ये अपेक्षेनुसार खेळता आले नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही फलंदाज अपयशी ठरले, ज्यामुळे संघाला विजय मिळवता आला नाही. एका व्हिडिओमध्ये यशस्वी जयस्वाल फलंदाजीचा सराव करण्यासाठी दोन बॅट घेऊन जात असल्याचे दिसून आले आहे. वाटेत तो रोहित शर्माला भेटतो. दोघे गप्पा मारतात. दरम्यान, रोहित यशस्वी जयस्वालची एक बॅट घेऊन सावलीचा सराव सुरू केला. जयस्वालची बॅट रोहितच्या तुलनेत हलकी असल्याने त्याने यशस्वीची बॅट घेतल्याचं बोललं जातंय.
advertisement
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS 2nd ODI : दुसऱ्या वनडे मॅचपूर्वी रोहित शर्माने का घेतली यशस्वी जयस्वालची बॅट? पाहा Video
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement