...तरच टीम इंडिया सेमी फायनलला जाणार, पॉईंट्स टेबल पाहून हरमनप्रीत टेन्शनमध्ये, वर्ल्ड कपच्या स्वप्नांचा चुराडा?

Last Updated:

महिला वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा लागोपाठ तिसरा पराभव झाला आहे. रविवारी इंग्लंडविरुद्धच्या थरारक सामन्यात टीम इंडियाला 4 रननी पराभूत व्हावं लागलं.

...तरच टीम इंडिया सेमी फायनलला जाणार, पॉईंट्स टेबल पाहून हरमनप्रीत टेन्शनमध्ये, वर्ल्ड कपच्या स्वप्नांचा चुराडा?
...तरच टीम इंडिया सेमी फायनलला जाणार, पॉईंट्स टेबल पाहून हरमनप्रीत टेन्शनमध्ये, वर्ल्ड कपच्या स्वप्नांचा चुराडा?
इंदूर : महिला वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा लागोपाठ तिसरा पराभव झाला आहे. रविवारी इंग्लंडविरुद्धच्या थरारक सामन्यात टीम इंडियाला 4 रननी पराभूत व्हावं लागलं. यंदाच्या स्पर्धेतला 5 सामन्यांमधला टीम इंडियाचा हा तिसरा पराभव आहे. तर पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया 2 विजय आणि 4 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे.
दुसरीकडे भारताचा पराभव करून इंग्लंडची टीम सेमी फायनलसाठी क्वालिफाय झाली आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या आधीच सेमी फायनलमध्ये पोहोचल्या आहेत, त्यामुळे आता एका जागेसाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रेस आहे. टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचणार का नाही? हे गुरूवारी ठरणार आहे, कारण भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गुरूवारी नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये सामना होणार आहे. टीम इंडियासाठी दिलासादायक बाब म्हणजे न्यूझीलंडचा फॉर्म, न्यूझीलंडला स्पर्धेत 5 पैकी फक्त 1 मॅच जिंकता आली आहे, तर त्यांनी 2 सामने गमावले असून त्यांचे 2 सामने पावसामुळे रद्द झाले आहेत.
advertisement
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 4 रननी पराभव झाला असला, तरीही भारतीय टीम अजूनही सेमी फायनलच्या रेसमध्ये कायम आहे. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी टीम इंडियाला त्यांच्या उरलेल्या दोन पैकी किमान एक सामना जिंकावा लागणार आहे. न्यूझीलंडनंतर भारतीय टीम 26 ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे.
advertisement

टीम इंडियाची कामगिरी

2025 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा 59 रननी पराभव करून स्पर्धेला दणक्यात सुरूवात केली होती. दीप्ती शर्माने 53 रनची खेळी केली आणि त्यानंतर 3 विकेटही घेतल्या, त्यामुळे तिला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. यानंतर भारताने पाकिस्तानचा 88 रननी पराभव केला, पण भारताला दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि आता इंग्लंडविरुद्ध धक्का बसला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
...तरच टीम इंडिया सेमी फायनलला जाणार, पॉईंट्स टेबल पाहून हरमनप्रीत टेन्शनमध्ये, वर्ल्ड कपच्या स्वप्नांचा चुराडा?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement