Zimbabwe vs Ireland मॅच होणार की नाही? पल्लीकेलेवरून आली मोठी अपडेट
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
झिम्बाबे आणि आयलँड यांच्यातील जवळपास सामन्याचा दीड तासाचा खेळ पावसामुळे वाया गेला आहे. त्यामुळे आता सामन्यासाठी आता कट ऑफ टाईमही जाहीर झाला आहे. या कट ऑफ टाईममध्ये ही जर सामना सूरू झाला नाही, तर सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
Zimbabwe vs Ireland : टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये आज दुसरा सामना हा झिम्बाबे आणि आयलँड या दोन संघात खेळवला जाणार आहे.पण मागच्या दीड तासापासून मैदानावर पाऊस सूरू आहे. त्यामुळे पावसामुळे सामन्याचा टॉस ही होऊ शकला नाही आहे. आता जवळपास सामन्याया दीड तासाचा खेळ पावसामुळे वाया गेला आहे. त्यामुळे आता सामन्यासाठी आता कट ऑफ टाईमही जाहीर झाला आहे. या कट ऑफ टाईममध्ये ही जर सामना सूरू झाला नाही, तर सामना रद्द होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फटका हा ऑस्ट्रेलियाला बसणार आहे.
आयलँड आणि झिम्बाबेमध्ये श्रीलंकेच्या पल्लीकेल आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना पार पडणार होता. पण मागच्या दीड तास सूरू असलेल्या पावसामुळे या सामन्याचा टॉसही होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता खूप वेळ वाया गेल्यामुळे कट ऑफ टाईम जाहीर करण्यात आला आहे. जर संध्याकाळी 6.10 वाजेपर्यंत सामना सूरू झाला तर 5 ओव्हरचा खेळ होणार आहे. जर 6.10 हून अधिक वेळ लागला तर सामना थेट रद्द होणार आहे. या परिस्थितीत दोन्ही संघाना एक एक गुण दिले जाणार आहेत.अशाप्रकारे एक गुण मिळवून झिम्बाबे तीन सामन्यात 5 गूणांसह थेट सूपर 8 मध्ये पोहोचणार आहे. तर आयर्लंडचे 4 सामन्यात तीन गुण होणार आहेत त्यामुळे ते या स्पर्धेतून बाहेर होणार आहेत.
advertisement
ऑस्ट्रेलियाचं बाहेर होणार
जर खरंच पावसामुळे सामना होऊच शकला नाही तर ऑस्ट्रेलियाचा गेमच झाला म्हणायचं. कारण ऑस्ट्रेलियाचा सूपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी झिम्बाबेचा आयर्लंडने पराभूत करणे आवश्यक आहे. यासह ऑस्ट्रेलियाला ओमान विरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे. पण जर पावसामुळे हा सामना रद्द झाला तर झिम्बाबे सूपर 8 मध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या उरल्या सूरलेल्या आशा संपुष्ठात येणार आहेत.
advertisement
ऑस्ट्रेलिया ओमान विरूद्ध शेवटचा सामना खेळेल,पण या सामन्यामुळे ते जास्तीत जास्त 4 गुणांपर्यंत पोहोचू शकणार आहेत. त्यामुळे या विजयाचा ऑस्ट्रेलियाला काहीच फायदा होणार नाही आहे आणि ते ग्रुप स्टेजमधूनच बाहेर होणार आहेत.
दरम्यान अद्याप तरी सामना रद्द करण्यात आला नाही आहे. सुरूवातीला सामन्याचे काही ओव्हर घटवले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरही जर पाऊस सूरूच राहिला तर सामना रद्द होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 4:37 PM IST









