आईचं स्वप्न लेकीनं केलं पूर्ण! अवघ्या 18 व्या वर्षी झाली पायलट; कसा होता तिचा खडतर प्रवास?
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
समायरा हुल्लूर हिने केवळ 18 व्या वर्षी कमर्शियल पायलट बनण्याचा विक्रम केला आहे. आई नाजिया हुल्लूर यांचं स्वप्न पूर्ण करत तिने 12 वी नंतर दिल्लीतील...
तुम्ही कधी विचार केला आहे का की, विमानांच्या कॉकपिटमधून जग कसं दिसेल? विजापूरच्या समायरा हुल्लूरने हे स्वप्न फक्त पाहिलं नाही, तर वयाच्या 18 व्या वर्षी भारताची सर्वात तरुण व्यावसायिक पायलट बनून ते खरं करून दाखवलं. आज ही मुलगी उंच भरारी घेऊ इच्छिणाऱ्या सर्व तरुणांसाठी एक उत्तम उदाहरण बनली आहे. चला तर मग, जाणून घेऊया या मुलीची प्रेरणादायी कहाणी...
असा आहे समैरा हुल्लूरचा प्रवास
राजस्थानच्या विजापूरची रहिवासी असलेल्या समायरा हुल्लूरने वयाच्या 18 व्या वर्षीच कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) मिळवून भारताची सर्वात तरुण पायलट होण्याचा विक्रम केला आहे. आता 18 वर्षांची समायरा लहानपणापासूनच घोडेस्वारी, रॉक क्लायंबिंग आणि पोहणे यांसारख्या साहसी खेळांची शौकीन होती. पायलट बनण्याचं स्वप्न तिच्या आईचं होतं, जे लेकीने पूर्ण केलं. तिची आई नाझिया हुल्लूर विजापूरमधील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये समन्वयक (Coordinator) म्हणून कार्यरत आहे. समायराच्या आईला नाझिया हुल्लूर यांना पायलटचा युनिफॉर्म आणि त्याचा मान नेहमीच आकर्षक वाटत असे. त्यांनीच आपली मुलगी समायराला पायलट बनण्याची प्रेरणा दिली आणि तिला पूर्ण पाठिंबा दिला.
advertisement
पाचवीत असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बसली
समायराने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती पाचवीत असताना विजापूरच्या नवरसपूर महोत्सवात हेलिकॉप्टरमध्ये बसली होती. तिची आई कॉकपिटमध्ये होती आणि युनिफॉर्म पाहून ती खूप प्रभावित झाली होती. काही वर्षांनंतर, दिल्ली विमानतळावर क्रू मेंबर्सना मिळणारा आदर पाहून तिच्या आईने तिला सांगितलं की, 'माझी इच्छा आहे की, तुलाही तुझ्या कामासाठी असाच आदर मिळावा.' नववीत असताना समायराने ठरवलं की, तिला डेस्क जॉब किंवा जास्त अभ्यासाची गरज असलेल्या क्षेत्रात जायचं नाही. तेव्हा तिच्या आईने तिला एव्हिएशन (विमानचालन) क्षेत्राचा सल्ला दिला.
advertisement
दहावीपासून पायलट होण्याचा अभ्यास सुरू केला
समायराने सांगितलं की, ती दहावीत असताना 'आकासा एअरलाईन्स'चे कॅप्टन थापेश कुमार यांच्याकडून एक ओरिएंटेशन क्लास घेतला, ज्यामुळे तिला एव्हिएशनचा मार्ग समजून घेण्यास मदत झाली. अकरावीपर्यंत ती पायलट बनण्यासाठी पूर्णपणे तयार झाली होती. समायरा म्हणाली की, जेव्हा तिच्या एका मित्राने तिला विचारलं, "किती पालक आपल्या मुलांना पायलट व्हायला सांगतात? तू भाग्यवान आहेस, कठोर परिश्रम कर." हे ऐकून तिला प्रोत्साहन मिळालं. यानंतर समायराने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
advertisement
पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास
बारावी बोर्डाच्या परीक्षांनंतर समायरा दिल्लीतील एका एव्हिएशन अकॅडमीमध्ये शिकायला गेली. तिथे तिला एअर रेग्युलेशन, एव्हिएशन मेट्रोलॉजी, एअर नेव्हिगेशन, टेक्निकल जनरल, टेक्निकल स्पेसिफिक आणि रेडिओ टेलिफोनी हे सहा पेपर पास करायचे होते. प्रत्येक पेपरमध्ये 70% गुण आवश्यक होते. बहुतेक विद्यार्थी एक किंवा दोन प्रयत्नात पास होतात, पण समायराने पहिल्याच प्रयत्नात पाच पेपर पास केले. रेडिओ टेलिफोनीसाठी वय 18 वर्षे असणं आवश्यक होतं, त्यामुळे तिला तीन वेळा रिजेक्शनचा सामना करावा लागला. तरीही, तिने सात महिन्यांत ग्राउंड ट्रेनिंग पूर्ण केलं.
advertisement
200 तासांच्या ट्रेनिंगनंतर मिळालं सर्टिफिकेट
एप्रिल 2024 मध्ये समैरा पुणे जिल्ह्यातील बारामती येथील कार्व्हर एव्हिएशनमध्ये दाखल झाली, जिथे 200 तासांच्या उड्डाण प्रशिक्षणांनंतर तिला CPL मिळालं. संपूर्ण प्रक्रिया 18 महिन्यांत पूर्ण झाली. समायरा म्हणाली की, जेव्हा ती पहिल्यांदा कॉकपिटमध्ये बसली आणि सूर्यास्ताच्या वेळी उड्डाण केलं, तो क्षण ती कधीच विसरणार नाही. तिच्या इन्स्ट्रक्टरने तिची सहनशक्ती आणि मोशन सिकनेस तपासण्यासाठी अनेक युक्त्या केल्या. समायराच्या इन्स्ट्रक्टरने तिला विचारलं, 'मजा येत आहे का?'
advertisement
तुमचं पहिलं सोलो उड्डाण कसं होतं?
सोलो उड्डाण (Solo flight) हे पायलटच्या प्रशिक्षणातील सर्वात खास क्षण असतो. बहुतेक पायलट 36 तासांच्या प्रशिक्षणानंतर सोलो उड्डाण करतात, पण समायराने हे आव्हान फक्त 28 तासांत पूर्ण केलं. समायरा म्हणाली की, जेव्हा तिने सोलो उड्डाण केलं, तेव्हा विमान इतकं हलकं वाटलं की, जणू त्याला वजनच नाही. तो अनुभव अविश्वसनीय होता. समायराने एका मुलाखतीत सांगितलं की, सुरुवातीला तिला लँडिंगमध्ये (विमान उतरवताना) अडचण येत होती. तिच्या इन्स्ट्रक्टरने तिला लँडिंग करताना दीर्घ श्वास घेण्यास आणि लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. या छोट्याशा सल्ल्यामुळे तिची समस्या सुटली.
advertisement
आई आणि आजींच्या डोळ्यात पाणी
CPL मिळाल्यावर अकॅडमीमध्ये समायराला तीन पट्ट्या (Three stripes) देऊन सन्मानित करण्यात आलं. समायराने सांगितलं की, हे पाहून तिच्या आई आणि आजींच्या डोळ्यात पाणी आलं. आजी माझ्या शाळेच्या निकालामुळे थोड्या दुःखी होत्या, पण लायसन्स मिळाल्यावर त्या खूप आनंदी होत्या. समायराने सांगितलं की, तिच्या शाळेत प्रमुख पाहुणी (Chief Guest) म्हणून जाणं हाही तिच्यासाठी अभिमानाचा क्षण होता. तिचे प्राचार्य नेहमी म्हणायचे की, असं काहीतरी कर की तू शाळेत प्रमुख पाहुणी म्हणून परत येशील. ते स्वप्न खरं झालं.
हे ही वाचा : कॅन्सपासून कोलेस्ट्रॉलपर्यंत... सर्व गंभीर आजारांवर 'मायक्रोग्रीन्स' रामबाण उपाय! तज्ज्ञ काय सांगतात?
हे ही वाचा : ₹50 च्या राखीसाठी द्यावे लागणार ₹7000! बहिणीने कुरियर कंपनीला शिकवला चांगलाच धडा, नेमकं प्रकरण काय आहे?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 27, 2025 2:42 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
आईचं स्वप्न लेकीनं केलं पूर्ण! अवघ्या 18 व्या वर्षी झाली पायलट; कसा होता तिचा खडतर प्रवास?