Success story: अपमानाचा बदला यशाने! बायकोलाच PSI केलं, सासऱ्याला दिलेला शब्द नवऱ्याने २ वर्षांत खरा करुन दाखवला
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Success story: जयदीप पिसाळ-देशमुख यांनी पत्नी कल्याणीला PSI बनण्यासाठी प्रेरणा दिली, आर्थिक जबाबदारी घेतली आणि तिच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. सोशल मीडियावर या जोडप्याची चर्चा.
पार्टनर असा असावा तसा असावा अशी बरीच स्वप्न पाहिली जातात. पण लग्नानंतर मात्र प्रत्यक्षात ती पूर्ण करणारा पार्टनर असेल तर आयुष्याची माती नाही तर सोनं होतं. लग्नानंतर मांडवातील केळीची पानं सुकली, अवघडलेल्या साडीत पाहून आपल्या बायोकच्या हातावर पंजाबी ड्रेस आणि पुस्तक ठेवलं. फिरायला, हनीमूनला जाण्याऐवजी 2 वर्षात अभ्यास करुन PSI होण्याचं स्वप्न दाखवलं, तिच्या पंखांना बळ दिलं.
पती-पत्नीचं नातं केवळ सुख-दुःखात सोबत करण्याचं नसतं, तर एकमेकांच्या स्वप्नांना साथ देण्याचंही असतं. हेच जयदीप पिसाळ-देशमुख यांनी त्यांच्या पत्नीच्या पीएसआय बनण्याच्या प्रवासात सिद्ध करून दाखवलं. नोकरी सांभाळून कुटुंबाची जबाबदारी: कुटुंबाची आर्थिक आणि दैनंदिन जबाबदारी जयदीप यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. नोकरी सांभाळूनही त्यांनी पत्नीच्या अभ्यासासाठी आवश्यक शांतता आणि प्रेरणा मिळेल याची काळजी घेतली.
advertisement
आजपासून साडीत अवघडायचं नाही, ही पुस्तक आणि आतली खोली तुझी, पुढच्या दोन वर्षात PSI व्हायचं असं म्हणून तो तिला बळ देतो. जयदीप पिसाळ देशमुख हे स्वत: दोनवेळा MPSC पास झाले होते. PSI आणि कुठलीशी पोस्ट मिळाली, वाठार स्टेशनला ट्रेन 2-3 मिनिटं थांबायची त्या वेळेत उसाचा रस विकून मेहनत केली. त्यातून पैसे जमा केले आणि शिकून MPSC परीक्षा उत्तीर्ण झाले.
advertisement
व्यवसाय करू गावाची सेवा करू म्हणत पोस्ट नाकारल्या. हिरो होंडाची फ्रांचायझी घेतली, गावाचे सरपंच झाले, गावाचा विकास करण्यावर भर दिला. पाणी फाउंडेशनची कामं केली. MSPC पास करुही नोकरी न केल्याने गावकऱ्यांनी नावं ठेवली. कल्याणी पिसाळवर त्यांचा जीव जडला होता. काम ना धाम MPSC पास होऊन बोंबलत फिरतोय असं कल्याणी यांच्या वडिलांनी अपमान केला. नको ते शब्द बोलले, अपमान सहन केला फक्त कल्याणीसाठी, अखेर त्यांनी कल्याणी यांच्या वडिलांना शब्द दिला. पुढच्या दोन वर्षात कल्याणी या PSI असतील.
advertisement
लग्नानंतर अवघ्या दोन वर्षात कल्याणी या PSI झाल्या. एकदा जयदीप यांना विचारलं होतं की तुमची ओळख आहे, गावात सगळं काही सुरळीत आहे, लोक तुम्हाला ओळखतात आता कल्याणी यांना PSI केल्यामुळे तुमचा दबदबा वाढलाय आता काय स्वप्न राहिलं आहे. तेव्हा जयदीप म्हणाले माझ्या बायकोला वर्दीमध्ये सॅल्यूट करायचं आहे. हे स्वप्नही त्यांनी पूर्ण केलं. या कपलची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.
advertisement
जोडीदार स्वप्नांना बळ देणारा असेल तर आयुष्याचं सोनं होतं. अखेरीस कठोर परिश्रम आणि जयदीप यांच्या भक्कम साथीमुळे त्यांच्या पत्नीने पीएसआय परीक्षेत यश मिळवलं. पतीचा भक्कम आधार आणि पत्नीची अथक मेहनत यामुळे हे स्वप्न साकार झालं.जयदीप यांनी दाखवून दिले की, एका यशस्वी पुरुषामागे जशी स्त्री उभी असते, तसेच एका यशस्वी स्त्रीमागे तिच्या जोडीदाराचा विश्वास आणि त्याग किती महत्त्वाचा असतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 2:34 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
Success story: अपमानाचा बदला यशाने! बायकोलाच PSI केलं, सासऱ्याला दिलेला शब्द नवऱ्याने २ वर्षांत खरा करुन दाखवला


