iPhoneबाबत झाली मोठी घोषणा, 9 सप्टेंबरला ॲपल पार्कमध्ये सकाळी 10 वाजता होणार...

Last Updated:

ॲपलने 9 सप्टेंबर 2025 रोजी आयफोन 17 सिरीजच्या भव्य लाँच इव्हेंटची घोषणा केली आहे. या इव्हेंटमध्ये iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max यांसह वॉच आणि एअरपॉड्सचे नवीन मॉडेल्स सादर होणार आहेत.

News18
News18
मुंबई:पलने आपल्या नवीन iPhone 17 सीरीजचे अनावरण करण्यासाठी 9 सप्टेंबर 2025 रोजी विशेष कार्यक्रमाची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम कॅलिफोर्नियातीलपल पार्कमध्ये सकाळी 10 वाजता (पॅसिफिक टाईम) आयोजित केला जाणार आहे. यावर्षीपलकडून iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max अशी चार नवी मॉडेल्स बाजारात आणली जाणार असून त्यामध्ये नवीन A19 चिपसेटमुळे अधिक चांगली कार्यक्षमता आणि AI-आधारित फीचर्स मिळणार आहेत.
advertisement
iPhone 17 इव्हेंटची प्रमुख वैशिष्ट्ये
या वर्षी एकूण चार मॉडेल्स लाँच होतील :
बेसिक iPhone 17
iPhone 17 Air (हा मॉडेल iPhone Plusच्या जागी येणार)
iPhone 17 Pro
advertisement
iPhone 17 Pro Max
Pro मॉडेलमध्ये नवीन अ‍ॅल्युमिनियम फ्रेम आणि बार-शेप रियर कॅमेरा मॉड्यूल असेल.
सर्व iPhone मॉडेल्समध्ये नवीन A19 किंवा A19 Pro चिप दिली जाईल. या चिपमुळे पॉवरफुल AI टूल्सअधिक चांगली ऊर्जा कार्यक्षमता मिळेल.
advertisement
iPhone 17 Air हा आतापर्यंतचा सर्वात पातळ आणि हलका iPhone असणार असून यामध्ये सुमारे 6.6 इंच स्क्रीन दिली जाईल.
नव्या iOS 26 अपडेटमध्ये स्मार्ट Siri, रिअल-टाईम ट्रान्सलेशन, आणि सुधारित फोटो एडिटिंगसारखे फीचर्स असतील.
advertisement
इतर अपेक्षित घोषणा
Apple Watch Series 11, Apple Watch Ultra 3 आणि Apple Watch SE 3 हे तीनही मॉडेल्स पहिल्यांदाच एकत्र अपडेट होऊन येतील.
AirPods Pro 3 चा नवीन डिझाइनसह लाँच होण्याची शक्यता आहे.
advertisement
HomePod Mini आणि Apple TV 4K यांचेही रिफ्रेश्ड व्हर्जन येण्याची अपेक्षा आहे.
विक्रीप्री-ऑर्डर
iPhone 17 सीरीज आणि संबंधित उत्पादने यांचे प्री-ऑर्डर 12 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
advertisement
प्री-ऑर्डरनंतर केवळ एक आठवड्याने म्हणजे 19 सप्टेंबरपासून हे नवे मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
iPhoneबाबत झाली मोठी घोषणा, 9 सप्टेंबरला ॲपल पार्कमध्ये सकाळी 10 वाजता होणार...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement