Meta चा 'निळा गोळा' झालाय आणखी हुशार! आता जुन्या गोष्टी लक्षात ठेवून देईल उत्तर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Meta AI Memory Feature: मेटाच्या एआय टूलमध्ये एक नवीन फीचर जोडण्यात आले आहे. त्यामुळे 'निळा गोळा' आता अधिक हुशार झाला आहे. आता जाणून घ्या यूझर्सना याचा कसा फायदा होईल?
Meta AI Memory Feature: हे AIचे युग आहे, म्हणजेच एआयच्या मदतीने तुम्ही अनेक गोष्टी सुलभ करू शकता. तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती हवी असेल, मजकूर लिहिणे असो किंवा फोटो एडिट करणे असो, एआयच्या मदतीने सर्व कामे काही मिनिटांत करता येतात. त्याच वेळी, मेटा आपला AI चॅटबॉट दिवसेंदिवस सुधारण्यासाठी देखील काम करत आहे.
या संदर्भात मेटाने आपल्या यूझर्ससाठी 'मेमरी फीचर' आणले आहे. हे फेसबुक, मेसेंजर आणि व्हॉट्सॲपवर मेटा एआय चॅटबॉटसह शेअर केलेल्या पर्सनल डिटेल्सची नोंद ठेवेल. उदाहरणार्थ, Meta AI चॅटबॉट तुम्हाला कोठे प्रवास करायला आवडते, तुम्हाला कोणती भाषा शिकण्यात जास्त रस आहे आणि इतर गोष्टींची नोंद ठेवेल.
advertisement
सध्या Meta चे हे फीचर US आणि कॅनडामध्ये iOS आणि Android यूझर्ससाठी आणले गेले आहे. मेटाचे मेमरी फीचर Google किंवा OpenAI च्या धर्तीवर काम करते. तुम्हाला सोप्या भाषेत समजल्यास, जर एखाद्या यूझरने मेटा एआय चॅटबॉटवर पूर्वीच्या (जुन्या) चॅटमध्ये शाकाहारी असल्याचे सांगितले असेल, तर मेटाचे एआय त्याच्याशी संबंधित विचार करेल. त्यानंतर तो तुम्हाला फक्त ब्रेकफास्टसाठी व्हेज फूडची माहिती देईल.
advertisement
मेटाने यावर स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की एआय चॅटबॉट फक्त वन टू वन संभाषणाच्या काही गोष्टी लक्षात ठेवेल. आपण इच्छित असल्यास, आपण ते हटवू शकता. तसंच, मेटाचे हे फीचर सिक्योरिटी आणि प्रायव्हसीविषयी मोठे प्रश्न निर्माण करते.
advertisement
मेटा म्हणते की AI चॅटबॉट आता सूचना देण्यासाठी त्याच्या सर्व ॲप्सवरून अकाउंटची माहिती घेईल. यामध्ये फेसबुक प्रोफाइलमधील यूझर्सचे स्थान किंवा Instagram वर अलीकडे पाहिलेले Video यासारख्या माहितीचा समावेश असू शकतो.
सोप्या भाषेत, जर तुम्ही वीकेंडला तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल आणि चॅटबॉटवरून त्यासंबंधी माहिती मिळवा. त्यामुळे AI तुम्हाला Facebook लोकेशन, अलीकडे पाहिलेल्या रील्सवर आधारित सजेशन देईल. हे फीचर भारतातही लवकरच आणले जाण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 28, 2025 2:09 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Meta चा 'निळा गोळा' झालाय आणखी हुशार! आता जुन्या गोष्टी लक्षात ठेवून देईल उत्तर


