WhatsApp वर येणार सर्वात मोठा बदल ! Username वापरून लोकांना शोधणं होणार सोपं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
इतर चॅटिंग ऍप्सपेक्षा Whats app वापरणं खूप सोपं आणि फायद्याचं आहे, ज्यामुळे युजर्सना देखील ते वापरायला आवडतं. म्हणून कंपनीदेखील आपल्या ग्राहकांसाठी चांगले आणि फायद्याचे फीचर्स आणत असते.
मुंबई, 10 डिसेंबर : आपल्या दैनंदिन जीवनात Whats app चा उपयोग अतिशय महत्वाचा झाला आहे. लोक आपल्या ऑफिसच्या कामापासून ते अगदी मित्र आणि कुटुंबियांशी बोलण्यापर्यंत सगळ्या गोष्टी Whats app वरुनच करतात. तो भारतातच नाही तर जगभरात खुपच प्रसिद्ध आहे.
इतर चॅटिंग ऍप्सपेक्षा Whats app वापरणं खूप सोपं आणि फायद्याचं आहे, ज्यामुळे युजर्सना देखील ते वापरायला आवडतं. म्हणून कंपनीदेखील आपल्या ग्राहकांसाठी चांगले आणि फायद्याचे फीचर्स आणत असते, ज्यामुळे Whats app वापरण्याचा आनंद ग्राहकांना घेता येईल. आता कंपनी आणखी एक नवं फीचर घेऊन येत आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
WABetaInfo ने शेअर केलेल्या माहितीनुसार, तुम्ही यूजर्सचे नाव किंवा प्रोफाइल फोटो वापरून त्यांना विना शोधू शकतो. हे नवीन फीचर WhatsApp च्या सर्च बारच्या वर नवीन टॅब म्हणून दिसेल.
advertisement
Whats App लवकरच एक नवीन सर्च बार फीचर आणणार आहे जे युजर्सला त्यांचे यूजर नेम वापरून इतरांना शोधण्याची परवानगी देईल. हे वैशिष्ट्य युजर्सला अधिक गोपनीयता प्रदान करेल कारण त्यांना त्यांचे वैयक्तिक फोन नंबर त्यात सामायिक करण्याची आवश्यकता नसेल. म्हणजेच तुमचा नंबर कोणत्याही व्यक्तीकडे जाणार नाही.
स्वतःचे यूजर नेम निवडण्याची असेल परवानगी:
हे बदल युजरला स्वत:साठी एक युजरनेम निवडण्याची परवानगी देईल, जे इतर यूजर्स त्यांना शोधण्यासाठी वापरू शकतात. ज्यांना त्यांचे फोन नंबर शेअर करायचे नाहीत त्यांच्यासाठी हे विशेषतः उपयुक्त ठरेल. हे इंस्टाग्राम किंवा इतर चॅटिंग ऍप्स प्रमाणे आहे. युजरनेम पूर्णपणे पर्यायी असतील, म्हणजे यूजर्स त्यांचे फोन नंबर वापरून इतरांशी संपर्क साधू शकतात.
advertisement
नव्या फीचरमध्ये बदलता येईल युजरनेम :
एका अहवालानुसार, यूजर्स त्यांना पाहिजे तेव्हा त्यांचे युजरनेम जोडू शकतात, हटवू शकतात किंवा बदलूही शकतात. हे त्यांना त्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार त्यांची गोपनीयता समायोजित करण्यास अनुमती देईल. नवीन बदल अद्याप develope होत असून WhatsApp च्या पुढील अपडेटमध्ये सादर केले जाईल. हे फीचर अँड्रॉईड आणि IOS या दोन्हींसाठी उपलब्ध असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
advertisement
WhatsApp ने गोपनीयता वाढवण्यासाठी एक नवीन फीचर जोडले आहे. हे फीचर युजरला त्यांच्या लॉक केलेल्या चॅटसाठी एक सिक्रेट कोड सेट करण्यास परवानगी देईल. हा कोड त्यांच्या फोन अनलॉक कोडपेक्षा वेगळा असेल, ज्यामुळे युजर्सला त्यांच्या खाजगी चॅट अधिक सुरक्षित ठेवण्यास मदत करेल.
या फीचरची घोषणा करताना, meta चे संस्थापक आणि सीईओ, मार्क झुकेरबर्ग म्हणाले की युजर्सला हे फिचर त्यांचे खासगी मॅसेजेस जपून ठेवण्यात मदत करेल जे एका सिक्रेट कोड नंतरच दिसतील असे सांगितले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 10, 2023 6:01 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
WhatsApp वर येणार सर्वात मोठा बदल ! Username वापरून लोकांना शोधणं होणार सोपं









