advertisement

Google साठी मोठं चॅलेंज, OpenAI लवकरच बाजारात आणणार Search Engine

Last Updated:

ओपनएआयने प्रत्येकाला आतुरता असलेल्या एआय-पॉवर्ड सर्च इंजिनच्या चाचणीचं काम सुरू केलं आहे. या सर्ज इंजिनला 'सर्चजीपीटी' असं नाव देण्यात आलं आहे.

प्रतिकात्म फोटो
प्रतिकात्म फोटो
मुंबई : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अतिशय झपाट्याने ऑनलाइन लँडस्केप बदलत आहे. एआय प्रत्येक इंटरनेट युझरच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर परिणाम करत आहे. ओपनएआय, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि मेटा यांसारख्या दिग्गज टेक कंपन्या टेक्नॉलॉजीच्या या नवीन युगाचं नेतृत्व करण्याच्या शर्यतीत आहेत. जनरेटिव्ह एआयच्या क्षेत्रात वर्चस्व मिळवण्याच्या लढाईनंतर आता एआय-पॉवर्ड सर्च इंजिनच्या निर्मितीचा प्रयत्न केला जात आहे.
ओपनएआयने प्रत्येकाला आतुरता असलेल्या एआय-पॉवर्ड सर्च इंजिनच्या चाचणीचं काम सुरू केलं आहे. या सर्ज इंजिनला 'सर्चजीपीटी' असं नाव देण्यात आलं आहे. हे नवीन टूल सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगलच्या वर्चस्वाला थेट आव्हान देईल. ओपनएआयने घोषणा केली आहे, की सर्चजीपीटीमधले सर्च रिझल्ट्स सुधारण्यासाठी आणि सोर्सेसचा संदर्भ देण्यासाठी व्यावसायिक भागीदारांकडून माहिती समाविष्ट केली जाईल.
advertisement
सर्च मार्केटमध्ये वर्षानुवर्षं वर्चस्व गाजवणाऱ्या गुगलला एआय तंत्रज्ञानाच्या झपाट्याने विकसित होत असलेल्या गतीशी बरोबरी करण्यात अडचण येत आहे. नेमक्या त्याच वेळी ओपनएआयने हे पाऊल उचललं आहे. नोव्हेंबर 2022मध्ये ओपनएआयने चॅटजीपीटी रिलीज करून या डेव्हलपमेंटची सुरुवात केली होती. याशिवाय, सर्चजीपीटी हे मायक्रोसॉफ्टच्या बिंजशी स्पर्धा करण्यास देखील सक्षम आहे.
ओपनएआयने म्हटलं आहे, की कंपनी सध्या एका तात्पुरत्या प्रोटोटाइपवर काम करत आहे. भविष्यात यातली सर्वोत्तम फीचर्स थेट चॅटजीपीटीमध्ये इंटिग्रेट करण्याची योजना आखली जात आहे.
advertisement
आपल्या वेबसाइटवरच्या निवेदनात कंपनीने असं म्हटलं आहे, की "आम्ही सर्चजीपीटीच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. हा नव्या सर्च फीचर्सचा एक प्रोटोटाइप असून, एआय मॉडेलची क्षमता आणि वेबवरची माहिती यांच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीने तो डिझाइन करण्यात आला आहे. त्यामुळे युझर्सना स्पष्ट आणि संबंधित सोर्ससह जलद आणि वेळेवर उत्तरं मिळतील. फीडबॅक मिळवण्यासाठी आम्ही युझर्स आणि पब्लिशर्सच्या एका लहान गटासह ते लाँच करत आहोत. हा प्रोटोटाइप तात्पुरता असला, तरी आम्ही भविष्यात यातली सर्वोत्तम फीचर्स थेट चॅटजीपीटीमध्ये इंटिग्रेट करण्याची योजना आखत आहोत. तुम्हाला प्रोटोटाइप वापरून पाहण्याची इच्छा असल्यास तुम्ही वेटलिस्टसाठी साइन अप करू शकता."
advertisement
सर्चजीपीटी संपूर्ण वेबवरच्या अद्ययावत माहितीसह युझर्सच्या प्रश्नांची लवकर आणि थेट उत्तरं देऊ शकतं. शिवाय, उत्तरांसोबत संबंधित माहितीच्या सोर्सेसच्या लिंकदेखील पुरवल्या जातील. याशिवाय यामध्ये युझर्स फॉलो-अप प्रश्नही विचारू शकतील.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Google साठी मोठं चॅलेंज, OpenAI लवकरच बाजारात आणणार Search Engine
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement