Petrol Pump वर चुकूनही करु नका 'या' गोष्टी, स्वत:च याल अडचणीत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आज आम्ही तुम्हाला अशाच काही नियमांबद्दल सविस्तर सांगणार आहोत. जे लक्षात ठेवणं तुमच्यासाठी गरजेचं आहे.
मुंबई : बाईक म्हटलं की पेट्रेल पंपावर इंधन भरण्यासाठी जाणं होतंच. पण पेट्रोल भरण्यासाठी पंपाचे काही स्वत:चे नियम असतात. जे पाळले तरच तुम्हाला पेट्रोल भरुन मिळतं.
काही भागात हेल्मेट घालून पेट्रोल पंपावर गेलो तरच तुम्हाला पेट्रोल पंपावर इंधन भरता येतं. जर तुम्ही तिथे हे नियम पाळले नाही तर तुम्ही तुमच्या बाईक किंवा स्कूटरमध्ये पेट्रोल भरू शकणार नाही आणि तुम्हाला रिकाम्या हाताने परतावे लागेल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही नियमांबद्दल सविस्तर सांगणार आहोत.
तुम्ही चुकूनही इंधन स्टेशनवर धुम्रपान करू नये, ते प्राणघातक ठरू शकते आणि तुमचा जीव जाऊ शकतो, एवढंच नाही तर पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा जीव धोक्यात येऊ शकतो.
advertisement
जर तुम्ही तुमच्या बाईक किंवा स्कूटरमध्ये पेट्रोल भरणार असाल तर तुम्ही हेल्मेट घालाच कारण त्याशिवाय तुमच्या वाहनात पेट्रोल भरलं जाणार नाही, याशिवाय बाटलीत पेट्रोल किंवा डिझेल कोणालाही दिले जात नाही.
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना तुम्ही कधीही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरू नये कारण अशा उपकरणांमुळे आग होऊ शकते.
पेट्रोल पंपावर फोनवर बोलणं टाळा, कारण असं केल्याने देखील रेडिओ किरणांमुळे आग लागू शकते.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 16, 2025 10:11 PM IST









