WhatsApp, Telegram सह Instagram वर होतेय फसवणूक; गृह मंत्रालयाचा रिपोर्ट, व्हा सावध

Last Updated:

Ministry of Home Affairs Scam Warning: गृहमंत्रालयाने नुकताच एक रिपोर्ट जारी केला आहे. ज्यात असे म्हटले आहे की, व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर सर्वाधिक फसवणूक होत आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊया...

व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, इंस्टाग्राम स्कॅम
व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, इंस्टाग्राम स्कॅम
WhatsApp Scam Alert 2025: तुम्हीही व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा इंस्टाग्राम वापरत असाल तर गृह मंत्रालयाचा रिपोर्ट पाहून तुम्हाला धक्का बसू शकतो. हे तिन्ही ॲप्स आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहेत, तर दुसरीकडे ही तीन ॲप्स सायबर गुन्हेगारांसाठी सोपे लक्ष्य बनल्याचे रिपोर्टमधून समोर आलेय. रिपोर्टनुसार, बहुतांश घोटाळे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून होत आहेत. चला जाणून घेऊया या रिपोर्टबद्दल सविस्तर...
स्कॅमर फक्त या ॲप्सनाच का लक्ष्य करत आहेत?
गृह मंत्रालयाच्या 2023-24 च्या वार्षिक रिपोर्टनुसार, सायबर गुन्हेगार या ॲप्सद्वारे लोकांना लक्ष्य करत आहेत. कारण या प्लॅटफॉर्मवर कोट्यावधी यूझर्स आहेत आणि त्यांचा दररोज वापर करतात. हे ऑनलाइन घोटाळ्यांसाठी सोपे लक्ष्य बनवते.
advertisement
WhatsAppवर सर्वाधिक स्कॅम होतात
सायबर गुन्हेगार प्रथम स्कॅम करण्यासाठी Google सर्व्हिस वापरतात. जिथून ते काही खास ऑफर्स प्रकारच्या जाहिराती सादर करतात. यानंतर, जर एखाद्या यूजरने या जाहिरातींवर क्लिक केले तर नंतर त्यांच्याशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला जातो. येथूनच घोटाळ्याची सुरुवात होते. गृह मंत्रालयाच्या वार्षिक रिपोर्टनुसार, 2024 च्या पहिल्या तीन महिन्यांत, सरकारला व्हॉट्सॲपद्वारे घोटाळ्यांचे सर्वाधिक 43,797 रिपोर्ट प्राप्त झाले. यानंतर, टेलिग्रामवर 22,680 घोटाळ्याचे रिपोर्ट आणि इंस्टाग्रामशी संबंधित 19,800 घोटाळ्याचे रिपोर्ट नोंदवले गेले.
advertisement
जागतिक स्तरावरही घोटाळे वाढत आहेत
गृहमंत्रालयाच्या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, मनी लाँड्रिंग आणि ऑनलाइन घोटाळे केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत तर जागतिक स्तरावरही ऑनलाइन घोटाळे सातत्याने वाढत आहेत. यामध्ये घोटाळे करणारे बहुतांशी बेरोजगार तरुण, घरात राहणाऱ्या महिला आणि विद्यार्थी यांना टार्गेट करतात, त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsApp, Telegram सह Instagram वर होतेय फसवणूक; गृह मंत्रालयाचा रिपोर्ट, व्हा सावध
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement