भिंवडी हादरले! ''2 मिनिटांत येते…'' म्हणत बाहेर पडली, पण परत आलीच नाही; 17 वर्षीय मुलीसोबत घडलं काय?
Last Updated:
Missing Girl Bhiwandi : घराबाहेर बिस्किट आणायला गेल्यानंतर घरी मुलगी परतलेली नाही. तिच्या वडिलांनी निजामपूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीसांचे पथक आता तिच्या शोधात आहेत.
अनगाव : दुकानात बिस्किट आणायला जाते असं सांगून एक अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडली पण ती परतलीच नाही. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने संपूर्ण परिसरात तणाव आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण असे मुलीचे नाव असून ही मुलगी कुटुंबियांसोबत भिवंडीतील कोंबडपाडा या परिसरात राहते. घटनेदिवशी घरातल्यांना सांगून मुलगी दुकानात बिस्किटे आणायला गेली. मात्र, बराच वेळं गेलेली पोरगी परतलेली नाही, त्यामुळे
तिच्या अचानक गायब होण्याने कुटुंब आणि शेजाऱ्यांना काळजी वाटू लागली.
काही वेळानंतर तिच्या वडिलांनी तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक डी.ए. घडगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. परिसरातील लोकांनी सांगितले की, मुलगी शेवटची एका दुकानाजवळ दिसली होती, पण पुढे ती कुठे गेली हे मात्र माहिती नाही.
advertisement
पोलिसांचा तपास सुरु...
view commentsपोलीसांनी परिसरात मुलीचा शोध घेतला शिवाय सर्व परिसरातील असेलेल सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत, शेजारी आणि दुकानदारांशी बोलणी केली जात आहे, तरीही अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. सध्या शाळा, मित्रमंडळी आणि कुटुंबीय शोध मोहिमेत सहभागी झाले असून सोशल मीडियावरदेखील तिच्या फोटोसह माहिती शेअर केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 10:45 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
भिंवडी हादरले! ''2 मिनिटांत येते…'' म्हणत बाहेर पडली, पण परत आलीच नाही; 17 वर्षीय मुलीसोबत घडलं काय?


