Mumbra News : 'आई' शब्दाने उघड केलं अपहरणाचं गूढ, मुंब्र्यात रिक्षावरच्या एका खुणेमुळे सुटला गुंता
Last Updated:
Mumbra kidnapping Case : तीन महिन्यांच्या बाळाच्या अपहरणाचा गुन्हा मुंब्रा पोलिसांनी उघडकीस आणला. ऑटोरिक्षावर लिहिलेल्या आई शब्दामुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला आणि तिघांना अटक करण्यात आली.
ठाणे : एका ऑटोरिक्षावर लिहिलेल्या फक्त एका शब्दामुळे तीन महिन्यांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा गुन्हा उघडकीस आला. आई असा शब्द असलेल्या ऑटोरिक्षामुळे मुंब्रा पोलिसांना मोठा धागा मिळाला आणि सहा दिवसांच्या तपासानंतर अपहरण प्रकरणाचा छडा लागला.
22 जानेवारीला काय घडलं होते?
मिळालेल्या माहितीनुसार,22 जानेवारी रोजी संध्याकाळी मुंब्रा येथील खादिमा मशीन रोडवर डीसीबी बँकेजवळ ही घटना घडली. फरजाना मन्सुरी (वय 23) या आपल्या दोन मुलींसह रस्ता ओलांडत असताना बुर्का परिधान केलेल्या एका महिलेने बाळाला हातात घेऊन रस्ता ओलांडते असे सांगितले. मात्र काही क्षणातच ती महिला बाळासह गर्दीतून गायब झाली.
advertisement
रिक्षावरचा तो एक शब्द आणि 1600 सीसीटीव्ही
सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित महिला आई असा शब्द लिहिलेल्या ऑटोरिक्षातून पळून गेल्याचे दिसून आले. पोलिस आयुक्त अशुतोष डुंब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली. तब्बल 1,600 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.
अनेक तपास आणि सीसीटीव्हीच्या आधारे नासरीन शेख हिला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिने बाळ मोहम्मद मुजीब गुलाब (वय 31) आणि त्याची पत्नी खैरुन्निसा (वय 30) यांच्याकडे दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी बाळाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 12:00 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Mumbra News : 'आई' शब्दाने उघड केलं अपहरणाचं गूढ, मुंब्र्यात रिक्षावरच्या एका खुणेमुळे सुटला गुंता






