प्रियकर की हैवान, प्रेयसीला वेगवेगळ्या ठिकाणी नेलं, Video काढले अन्..., भिवंडीतील संतापजनक प्रकार
- Reported by:
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Thane News: प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेत अत्याचार केले. त्यानंतर फोटो आणि व्हीडिओ...
ठाणे: सोशल मीडियावरून प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणुकीचे प्रकार हल्ली वाढले आहेत. असाच काहीसा संतापजनक प्रकार भिवंडीत घडला आहे. 23 वर्षीय तरुणीशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. तिच्यावर अत्याचार करून खासगी व्हीडिओ, फोटो काढले आणि ते नातेवाईक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल केले. प्रियकरच हैवान असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने थेट पोलिसांत धाव घेतली.
निखिल गोविंदसिंग गौतम असे 26 वर्षीय प्रियकराचे नाव आहे. तो काल्हेर परिसरात राहत असून त्याने एका तरुणीशी मैत्री केली. प्रेमाच्या जाळ्यात ओढून 16 जून ते जानेवारी अशा काळात तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेत अत्याचार केले. या काळात खासगी क्षणांचे गुपचूप फोटो आणि व्हीडिओ काढले.
advertisement
दरम्यान, निखिलने ते फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर ही बाब तरुणीच्या लक्षात आली. आपली फसवणूक करून बदनामी केल्याचे लक्षात येताच तरुणीने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी निखिलवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावरून मैत्री आणि त्यानंतर अत्याचार आणि फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे तरुण-तरुणींनी कोणतेही पाऊल उचलताना योग्य ती काळजी घ्यावी.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 10:37 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
प्रियकर की हैवान, प्रेयसीला वेगवेगळ्या ठिकाणी नेलं, Video काढले अन्..., भिवंडीतील संतापजनक प्रकार









