Thane : ऑनलाईन औषध मागवले अन् महिलेच्या अंगाचा थरकाप उडाला; घरबसल्या घडलेला धक्कादायक प्रकार उघडकीस
Last Updated:
Thane Cyber Fraud : ठाण्यात ऑनलाईन औषधे मागवल्यानंतर क्रेडिट कार्डद्वारे तब्बल नऊ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे : ठाणे शहरातील नौपाडा परिसरात ऑनलाईन फसवणुकीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अनुराधा पारसनीस (वय 59)या महिलेची तब्बल नऊ लाख 28 हजार 796 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
महिलेची ऑनलाइन खरेदी ठरली दुर्दैवी
मिळालेल्या माहितीनुसार,3 जानेवारी 2026 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पारसनीस यांनी ऑनलाईन पद्धतीने काही औषधे मागवली होती. औषधे घरपोच आल्यानंतर संबंधित डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीने क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरण्याची विनंती केली. त्यानुसार पारसनीस यांनी प्रथम एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड त्याला स्वाईप करण्यासाठी दिले. मात्र पैसे ट्रान्सफर झाले नसल्याचे सांगत त्या व्यक्तीने कार्डमध्ये बॅलेन्स नसल्याचे सांगितले.
advertisement
यानंतर पारसनीस यांनी एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्डही दिले. कार्ड स्वाईप केल्यानंतर त्याने बिल दिले आणि पैसे कापले नसल्याचे सांगून निघून गेला. मात्र काही वेळानंतर पारसनीस यांच्या लक्षात आले की त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डमधून सहा लाख एक हजार 121 रुपये खर्च झाले आहेत. तसेच एसबीआय क्रेडिट कार्डवरून तीन लाख 27 हजार 675 रुपये वजा झाल्याचे दिसून आले.
advertisement
विशेष म्हणजे या व्यवहारांसाठी पारसनीस यांनी कोणताही ओटीपी दिलेला नव्हता. तरीही क्रेडिट कार्डची माहिती गैरमार्गाने मिळवून अज्ञात व्यक्तीने ही मोठी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 8:58 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane : ऑनलाईन औषध मागवले अन् महिलेच्या अंगाचा थरकाप उडाला; घरबसल्या घडलेला धक्कादायक प्रकार उघडकीस










