advertisement

ठाणे पालिकेत पहिल्याच दिवशी राडा, एकनाथ शिंदे भडकले; नगरसेवकांना फोन करून झाप झाप झापलं

Last Updated:

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत सभागृहातील नगरसेवकांचे वर्तन अशोभनीय असल्याचे म्हणत खडसावले आहे.

News18
News18
ठाणे :  ठाणे महापालिकेतील महासभेच्या पहिल्याच दिवशी भाजप आणि शिवसेनेत खंडाजंगी पाहायला मिळाली. सत्तास्थापनाच्या वेळी दोन्ही पक्षांनी युती करून शिंदेगटाने महापौरपदावर दावा करत भाजपला उपमहापौरपद दिले. मात्र महासभेच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्षांमध्ये गोंधळ झाल्याने उपमहापौरांना त्यांची खुर्ची सोडून बाहेर पडावे लागले. घडलेल्या प्रकारनंतर ⁠पहिल्या महासभेत झालेल्या प्रकारावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
⁠भाजपाचे उपमहापौर कृष्णापाटील यांनी थेट महासभेतून वॅाक आऊट केले . बोलू दिले जात नाही म्हणून भाजपा महिला नगरसेविकांनी घोषणाबाजी केली. ⁠शिवसेना जाणीवपूर्वक भाजपाला डावलत असल्याचा आरोप  केला आहे. ⁠आम्ही जनतेला बांधिल आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत असे म्हणत भाजपा नगरसेवक आक्रमक झाले. या प्रकारानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत सभागृहातील नगरसेवकांचे वर्तन अशोभनीय असल्याचे म्हणत खडसावले आहे.
advertisement

एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना खडसावले

⁠उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौर, शिवसेना गटनेते आणि शिवसेना नगरसेवकांना फोन केले. सभागृहात खेळी मेळीचे वातावरण पाहिजे आणि  ⁠मित्र पक्षांना योग्य तो मान सन्मान दिला पाहिजे, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नगरसेवकांना सूचना दिल्या आहेत.

पवन कदम काय म्हणाले? 

एकनाथ शिंदेंच्या फोननंतर शिवसेना गटनेता पवन कदम यांना टेंभी नाक्याचा आनंद दिघेंचा हंटर आठवला. चुकीचे काम केले तर दिघे साहेबांचा हंटर पडेल हे आम्हाला माहिती आहे याची आठवण झाली,. ठाणे मनपावर शिंदे साहेबांचे बारीक लक्ष आहे. दिघे साहेबांनी तो हंटर का चालवला होता ते आजही आम्हाला लक्षात आहे, असेही पवन कदम म्हणाले.
advertisement

ठाणे महापालिकेत नेमकं काय झालं?

ठाणे मनपाच्या पहिल्य महासभेत भाजप आणि शिवसेना आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे उपमहापौर कृष्णापाटील यांनी थेट महासभेतून बाहेर पडले. आम्हाला ⁠बोलू दिले जात नाही म्हणून भाजप महिला नगरसेविकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना जाणीवपूर्वक आम्हाला डावलत असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला. आम्ही जनतेला बांधिल असून आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजेत असे म्हणत भाजप नगरसेवक आक्रमक झाले होते. ठाणे महापालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढले होते. सत्तेचा असणाऱ्या भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार खडाजंगी झालेली यावेळी पाहायला मिळाली. महसभा सत्ताधारी शिंदे गट आणि प्रशासनाने फक्त 10 मिनिटात गुंडाळली असल्याने भाजपच्या नगरसेवकांनी थेट व्यासपीठावर जात जाब विचारला. आक्रमक नगरसेवकांनी सभागृहाबाहेर प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. पहिल्याच महासभेत भाजप आणि शिंदे गटामध्ये गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या पहिल्याच महासभेला कलंक लागला असल्याची घोषणा भाजपच्या नगरसेवकांनी भर सभेत दिली.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
ठाणे पालिकेत पहिल्याच दिवशी राडा, एकनाथ शिंदे भडकले; नगरसेवकांना फोन करून झाप झाप झापलं
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement