Crime : इन्स्टाग्रामवरच्या एका 'फ्रेंड रिक्वेस्ट'ने उद्ध्वस्त केलं आयुष्य; पालघरमधील 17 वर्षीय युवतीची सुन्न करणारी कहाणी
Last Updated:
Palghar Crime : पालघरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. जिथे एका तरुणाशी ऑनलाईन मैत्री अन् नंतर प्रेम करणं एका अल्पवयीन मुलीला फार महागात पडले आहे.नक्की काय घडले ते एकदा सविस्तर जाणून घ्या.
ठाणे : पालघर जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीचा एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी केलेली मैत्री एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला खूप महागात पडली.
नेमकं घडलं काय?
पालघरमधील वालीव भागात राहणाऱ्या या मुलीची ओळख इन्स्टाग्रामवरून आरोपीशी झाली. पण सुरुवातीला साधी वाटणारी ही मैत्री लवकरच प्रेमसंबंधात बदलली. याच संधीचा फायदा घेत आरोपीने मुलीला आपल्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या जाळ्यात ओढले आणि फेब्रुवारी 2025 च्या आसपास दोघंही मध्य प्रदेशात पळून गेले. मात्र घरातील मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने घरच्यांनी लगेच जाऊन पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल केला मात्र अनेक दिवस उलटून गेले पण तिचा शोध लागला नाही.
advertisement
घरुन गेली ती मध्य प्रदेशात अडकली
पोलिसांच्या माहितीनुसार,अल्पवयीन मुलगी फेब्रुवारी ते सप्टेंबर 2025 या सात महिन्यांदरम्यान आरोपीसोबत मध्य प्रदेशात राहिली. या काळात आरोपीने तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले. आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला आणि तिला सतत त्रास दिला. सततच्या शोषणामुळे आणि छळामुळे त्रस्त झालेल्या मुलीने अखेर सप्टेंबर 2025 मध्ये हिंमत करून आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि ती कशीबशी आपल्या घरी परतली.
advertisement
घरी येताच सांगितला संपूर्ण प्रकार मात्र पुढे जे घडलं..
घरी परतल्यावर तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबाला सांगितला. पण मुलीच्या घरी परतल्यानंतरही आरोपी थांबला नाही. त्याने मुलीची बदनामी करण्याच्या उद्देशाने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि माहिती सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली. तिला पुन्हा परत येण्यासाठी ब्लॅकमेल तो करत होता. या ब्लॅकमेलिंगमुळे मुलीचे कुटुंब खूप हादरले.
advertisement
आरोपी फरार
view commentsआरोपीच्या अशा वागण्यामुळे घरातले पुन्हा एकदा हादरुन गेले पण पीडित मुलीच्या बहिणीने पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी 28 डिसेंबर 2025 रोजी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम 64बलात्कार,पॉक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.सध्या आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 8:11 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Crime : इन्स्टाग्रामवरच्या एका 'फ्रेंड रिक्वेस्ट'ने उद्ध्वस्त केलं आयुष्य; पालघरमधील 17 वर्षीय युवतीची सुन्न करणारी कहाणी








