Thane Crime : CID पेक्षा शॉकिंग स्टोरी! नदी पात्रात मिळाला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; पोलिसांसमोर उभे राहिले नवे प्रश्न
Last Updated:
Boisar Crime : बोईसरमधील एका नदीच्या पात्रालगत गावकऱ्यांना कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेला आहे. मात्र जेव्हा पोलिस घटना स्थळी पोहचले तेव्हा पोलिसही अक्षरशा हादरुन गेले.
बोईसर : एखाद्या क्राईम सिरीयलमध्यला गोष्टीला ही पाठी सोडेले अशी एक घटना बोईसरमधून उघडकीस आलेली आहे. जिथे सूर्या नदीपात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने बोईसर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मनोर पोलीस ठाणे हद्दीतील नागझरी गावाजवळील निर्जन परिसरात हा मृतदेह आढळून आला.
नदीच्या पात्रातून उघडकीस आली थरारक घटना
नदीच्या पात्राशेजारी दुर्गम भाग असल्याने सुरुवातीला स्थानिकांना काहीच कल्पना नव्हती. मात्र दुर्गंधी येऊ लागल्यानंतर ग्रामस्थांनी तपास केला असता झुडपांमध्ये एका व्यक्तीचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. ही घटना समजताच ग्रामस्थांनी पोलिसांना तात्काळ या बाबतची माहिती कळवली,पंरतू या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर मृतदेहाची अवस्था पाहून हा मृतदेह किमान दीड ते दोन महिन्यांपूर्वीचा असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला. मृतदेह इतका कुजलेला होता की त्याची ओळख पटवणे जवळजवळ अशक्य झाले होते. चेहरा ओळखू न येण्याच्या स्थितीत होता तर शरीरावरचे कपडेही नष्ट झाले होते. त्यामुळे मृत व्यक्तीची कोणतही ओळख होऊ शकली नाही. सध्या या मृत्यूचे कारणही स्पष्ट होत नसल्याने गुन्हा किंवा अपघात याबाबतची शंका पोलिसांना येत आहे.
advertisement
घटनास्थळावरून कोणतेही शस्त्र किंवा संशयास्पद साहित्य सापडले नसले तरी मृतदेह ज्या पद्धतीने टाकण्यात आला आहे, त्यावरून संशय वाढत चालला आहे. पोलिसांनी तातडीने मृतदेह पंचनामा करून तो मुंबई फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे. डीएनए चाचणी, हाडांची तपासणी आणि इतर वैज्ञानिक विश्लेषणानंतरच मृतदेहाची ओळख आणि मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान जवळपासच्या गावांतील हरवल्याच्या तक्रारींची नोंद तपासण्यासाठी पोलीस कर्मचारी प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन महिन्यांत कोणी बेपत्ता झाल्याची नोंद आहे का याची बारकाईने चौकशी सुरू आहे. स्थानिकांमध्ये मात्र या प्रकरणामुळे दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांचे पुढील तपास आणि फॉरेन्सिक अहवाल काय सत्य उघड करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2025 12:38 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Crime : CID पेक्षा शॉकिंग स्टोरी! नदी पात्रात मिळाला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; पोलिसांसमोर उभे राहिले नवे प्रश्न


