छत्रपती संभाजीनगर: पैठण तालुक्यातील कातपूर येथे अशोक आढाव हे विविध प्रकारच्या पालेभाज्यांची शेती करत असतात. सध्या ते दहा गुंठे क्षेत्रामध्ये दोडका भाजीची शेती करत आहेत. दररोज बाजारात पाच ते सहा दोडक्यांच्या कॅरेटची विक्री केली जाते. एका कॅरेटला 500 ते 600 रुपये भाव मिळतो. असे एकूण प्रत्येकी दिवसाला 3000 हजार रुपयांची कमाई आढाव यांची होते, त्यामुळे 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये अशोक यांना 1.25 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा अशोक आढाव यांनी 'लोकल 18' सोबत बोलताना व्यक्त केली.
Last Updated: Jan 06, 2026, 15:54 IST


