लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली रामभूमी; मुख्यमंत्री योगींच्या हस्ते आरती

Author :
Last Updated : बातम्या
प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. शरयू नदीच्या तीरावर 25 लाख दिवे लावलेत. लक्ष लक्ष दिव्यांनी प्रभू श्रीरामाची अयोध्या नगरी उजळून गेलीय. लेझर शोचाही लखलखाट पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिला दिवा लावून दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. शरयू नदीच्या तीरावर योगी आदित्यनाथ यांनी आरतीही केली. तसंच योगी आदित्यनाथ यांनी राम, सीता आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची आरती केली. तसंच त्यांना टिळाही लावला.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली रामभूमी; मुख्यमंत्री योगींच्या हस्ते आरती
advertisement
advertisement
advertisement