...तर कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रिपद नको, भुजबळ असं का म्हणाले?

Last Updated : Politics
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी छगन भुजबळांनीदेखील भाष्य केलंय. बीड प्रकरणातील दोषींवर कारवाई होणारच, तर जो दोषी असेल त्याला फाशीच द्या अशी माागणी भुजबळांनी केलीय. तर धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागताय, चौकशीत मुंडेंविरोधात काही समोर आलंय का? असा सवाल करत छगन भुजबळांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केलीय. धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध करा, असं भुजबळ म्हणालेत. तर कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रिपद नको, मंत्रिपद काही सहज मिळत नाही. कुणावरही अन्याय होता कामा नये, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिलीय. तर नाराजीच्या प्रश्नावरदेखील भुजबळांनी भाष्य केलंय. माझ्या सर्व भावना मेल्यात, मला काहीच बोलायचं नाही. असं भुजबळ म्हणाले आहेत.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
...तर कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रिपद नको, भुजबळ असं का म्हणाले?
advertisement
advertisement
advertisement