अंबरनाथ नगर पालिका निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस नगरसेवकांनी युती केल्यामुळे वरिष्ठ स्तरावरील नाराजी व्यक्त केली गेली. काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले नगरसेवक थेटपणे भारतीय जनता पक्षात गेल्याने काँग्रेसला जबर झटका बसला. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने पक्ष कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. राज्य आणि देशपातळीवर विचारधारेच्या मुद्द्यावरून लढणाऱ्या काँग्रेस-भाजपची युती झाल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. दोन्ही पक्षांवर टीका सुरू झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पावले उचलून नगरसेवकांवर कारवाई करण्याचे पाऊल उचलले.
Last Updated: Jan 08, 2026, 21:47 IST


