सोलापूर : मांडव सजलं होतं, वऱ्हाडी जमले होते, हळद लागली, नवरा आला अन् लग्नकार्य सुरळीत पार पडलं. जेवणं झाली, आहेरं पडली. आपली मुलीकडची बाजू म्हणून नवरीच्या आई-वडिलांच्या मनात वरात जाईपर्यंत धाकधूक होती. नवरी मात्र आज मुलगी म्हणून माझा इथला शेवटचा दिवस असं समजून घराचा कोपरान् कोपरा डोळ्यात सामावून घेत होती. शेवटी वेळ झाली निघण्याची. वाजत-गाजत वरात निघाली. बैलगाडीत नवरा-नवरी बसले आणि मागे-पुढे वऱ्हाड्यांनी नाचून नाचून धुमाकूळ घातला.
Last Updated: October 31, 2025, 17:30 IST