पारंपरिक खण आता सजावटीत – ठाण्यात मिळतायत बजेट-फ्रेंडली डेकोर वस्तू

ठाण्यात सणासुदीचा आनंद आणि घरगुती सजावटीला पारंपरिक स्पर्श देण्यासाठी ‘सखी क्रिएटिव्हस’ कडे खणाच्या आकर्षक कापडातून बनवलेले विविध होम डेकोर आणि गिफ्टिंग आयटम्स उपलब्ध आहेत. या आयटम्समध्ये पारंपरिक आणि ट्रेंडी डिझाइन्सचा सुंदर संगम दिसून येतो. या आयटम्समध्ये खणेरी टोपी 299 रुपयांपासून, खणाची ओढणी आणि क्लचेस प्रत्येकी 799 रुपयांपासून उपलब्ध आहेत. भावभीजीच्या ओवाळणीसाठी खास तयार केलेल्या पॉकेट्स 90 रुपये, घर सजावटीसाठी तोरण 500 रुपयांपासून विक्रीस आहेत. तसेच खणाच्या छोट्या डायरीज 100 रुपये, फ्रेम्स 250 ते 450 रुपये, पाठ आसन आणि पिलो कव्हर 350 रुपये याप्रमाणे विविध आयटम्स ग्राहकांच्या पसंतीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय खण डायरी 399 रुपये, नेम प्लेट 999 रुपये आणि फ्रिज मॅग्नेट्सही उपलब्ध आहेत जे सणाच्या काळात गिफ्टिंगसाठी किंवा घर सजावटीसाठी खास पर्याय ठरू शकतात.हे सर्व आयटम्स 100 रुपयांपासून सुरू होतात जे कोणत्याही बजेटमध्ये सहज बसतात. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार पर्याय निवडता येतात. शिवाय ‘सखी क्रिएटिव्हस’ कस्टमाईज्ड आयटम्सचीही सोय देतात म्हणजेच ग्राहक त्यांच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार खास डिझाइन करून घेऊ शकतात.

Last Updated: Sep 29, 2025, 16:56 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/ठाणे/
पारंपरिक खण आता सजावटीत – ठाण्यात मिळतायत बजेट-फ्रेंडली डेकोर वस्तू
advertisement
advertisement
advertisement