AUS vs ENG: क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची लढत म्हणजेच ॲशेस मालिकेची जोरदार सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांनी वर्चस्वासाठी जबरदस्त संघर्ष केला. वेगवान गोलंदाजी आणि अप्रतिम फलंदाजी यांच्यातील कडव्या झुंजीत पहिल्या दिवसाचा खेळ वेगवान गोलंदाजांनी गाजवला. मॅचच्या पहिल्या दिवशी 19 विकेट पडल्या. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 172 धावात ऑलआउट केला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 123 धावांवर 9 विकेट गमावल्या होत्या. ऑस्ट्रेलिया अद्याप 49 धावांनी पिछाडीवर असन ॲशेसचा थरार पहिल्याच दिवशी शिगेला पोहोचला असून, दुसऱ्या दिवशी कोणता संघ आघाडी घेतो याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Last Updated: November 21, 2025, 19:30 IST