'सिंदूर'च्या दणक्यानंतर पाकिस्तानची मस्ती जिरली; हात जोडत म्हणाले- पुन्हा कारवाई नको; वाद, तणाव चर्चा करून संपवू

Last Updated:

India Missile Strike: पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत जोरदार हवाई हल्ला केला. ज्यामुळे पाकिस्तान पुरता हादरला आहे. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून पाकिस्तान आता तणाव कमी करण्याची भाषा बोलत आहे.

News18
News18
इस्लामाबाद: जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामागे असलेला पाकिस्तान आता भारतासोबतचा तणाव कमी करण्यास इच्छुक दिसत आहे. भारतीय सैन्याने मंगळवार-बुधवारच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ चालवत पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर मिसाइलने जोरदार हल्ला चढवला. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-कश्मीरमधील तब्बल 9 दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. या हल्ल्यामुळे पाकिस्तान पुरता हादरला असून आता त्यांनी भारतासोबत तणाव कमी करण्याची भाषा सुरू केली आहे.
तणाव कमी करण्यास तयार
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. पाकिस्तान भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी तयार आहे. जर भारताने सकारात्मक आणि नरम भूमिका घेतली तर पाकिस्तान निश्चितपणे तणाव संपवण्यासाठी पुढे येईल. ख्वाजा आसिफ यांचे हे वक्तव्य भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या मिसाइल हल्ल्याच्या काही तासांनंतर आले आहे. यावरून या हल्ल्याचा पाकिस्तानवर मोठा परिणाम झाल्याचे स्पष्ट होते.
advertisement
ख्वाजा आसिफ यांनी काय म्हटले?
ब्लूमबर्ग टेलिव्हिजनने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, पाकिस्तान केवळ तेव्हाच प्रत्युत्तर देईल जेव्हा त्यांच्यावर हल्ला होईल. आसिफ म्हणाले, आम्ही गेल्या पंधरा दिवसांपासून सतत सांगत आहोत की आम्ही भारताच्या विरोधात कोणतीही शत्रुतापूर्ण कारवाई सुरू करणार नाही. पण जर आमच्यावर हल्ला झाला. तर आम्ही नक्कीच त्याचे उत्तर देऊ. जर भारताने नरमाईची भूमिका घेतली तर आम्ही निश्चितपणे हा तणाव संपवू.
advertisement
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान पुरता बॅकफूटवर गेला असल्याचे या विधानांवरून स्पष्ट होते. पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने दाखवलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला आता शांततेची भाषा बोलणे भाग पडले आहे. आता भारत यावर काय प्रतिक्रिया देतो आणि दोन्ही देशांमधील तणाव खरोखरच कमी होतो का, हे पाहणे महत्त्वाचे असेल.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
'सिंदूर'च्या दणक्यानंतर पाकिस्तानची मस्ती जिरली; हात जोडत म्हणाले- पुन्हा कारवाई नको; वाद, तणाव चर्चा करून संपवू
Next Article
advertisement
Tejasvi Ghosalkar On Uddhav Thackeray: 'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरमधलं राजकारण तापलं
'अभिषेकचं नाव घेऊन तुम्ही...,' उद्धव ठाकरेंवर तेजस्वी घोसाळकरांचा पलटवार, दहिसरम
  • मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे

  • भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला

  • दहिसरमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी अभिषेक घोसाळकर असता तर त्याने पक्ष सोडला नस

View All
advertisement