कोट्यवधींची केली केळंखरेदी, मीडियासमोर केलं असं काम की सगळीकडे होतेय चर्चा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक केळं आणि डक्ट टेपचा रोल एक स्मृतिचिन्ह म्हणून देण्यात आलं.
नवी दिल्ली : तुम्ही केळं कधी ना कधी नक्कीच खाल्लं असेल, पण त्याची किंमत कोट्यवधी रुपये खचितच नसणार. मात्र, सध्या एका केळ्याची चर्चा सुरू आहे, ज्याची किंमत काही हजार, काही लाख नाही तर कोटींमध्ये आहे. या केळ्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. मूळचे चीन येथील क्रिप्टोकरन्सीचे संस्थापक जस्टिन सन यांनी एक आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.
सन यांनी सर्वांत आधी 6.2 मिलियन डॉलर्स म्हणजेच 52.4 कोटी रुपये मोजून भिंतीवर टेपने अडकवलेल्या केळ्याची कलाकृती विकत घेतली. त्यानंतर मीडिया आणि इतर लोकांच्या उपस्थितीत त्या कलाकृतीतलं केळं खाल्लं. हाँगकाँगमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान सन यांनी मीडियाशी संवाद साधला आणि नंतर इटालियन कलाकार मॉरिझियो कॅटेलनने बनवलेले आर्टवर्क फेमस करून ते महागडं केळं खाल्लं. जस्टिन सन यांनी केळ्याच्या स्वादाबद्दल सांगितलं. तसेच कला व क्रिप्टो यांच्यातील समानता सांगितली. ते इतर केळ्यांपेक्षा खूप चांगलं आहे, असं ते म्हणाले.
advertisement
रिपोर्टनुसार, या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक केळं आणि डक्ट टेपचा रोल एक स्मृतिचिन्ह म्हणून देण्यात आलं. आधी केळ्याचा लिलाव झाला होता. सन यांनी या पूर्वी सहा जणांसह कलाकृतीच्या लिलावात भाग घेतला होता. हा लिलाव न्यूयॉर्कमध्ये झाला होता. कलाकृतीत असलेलं केळं खाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या पूर्वी दोनदा अशा प्रकारे केळी खाल्ली गेली आहेत. असं केळं पहिल्यांदा 2019 मध्ये एका प्रदर्शनात आर्टिस्टने आणि पुन्हा एकदा 2023 मध्ये एका दक्षिण कोरियाच्या विद्यार्थ्याने खाल्लं होतं. मात्र, या आधीच्या अशा प्रकरणांमध्ये कोणीही पैसे खर्च केले नव्हते.
advertisement
कलाकृती असलेलं केळं का खाल्लं?
view commentsउद्योगपती सन यांनी मागच्या आठवड्यात लिलाव जिंकल्यानंतर लगेचच कलाकृतीच्या इतिहासाची नोंद करण्यासाठी हे फळ खाणार असल्याची योजना जाहीर केली होती. “येत्या काही दिवसांत मी वैयक्तिकरित्या असं आर्टवर्क असलेली केळी खाईन. जेणेकरून कला इतिहास आणि लोकप्रिय संस्कृती या दोन्ही क्षेत्रांतील स्थानाचा सन्मान होऊ शकेल. हे एका सांस्कृतिक घटनेचे प्रतिनिधित्व करते जे कला, मीम्स आणि क्रिप्टोकरन्सी समुदायाला एकत्र आणतं", ही घोषणा करताना जस्टिन सन असं म्हणाले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2024 10:50 AM IST


