चीनच्या 'सीक्रेट लेडी'च्या खेळीने अमेरिका हादरली; प्रोजेक्ट C929ने पायाखालची जमीन सरकली, धाकधूक वाढली
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
अमेरिका-चीन व्यापार युद्धात चीनने असा डाव टाकला आहे. ज्यामुळे अमेरिकेची मोठी कोंडी झाली आहे. एका रहस्यमय महिलेच्या नेतृत्वाखाली चीन आता अमेरिकेला हवाई क्षेत्रात आव्हान देण्याच्या तयारीत आहे.
बीजिंग: अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध (America-China Trade War) अधिक तीव्र होताना दिसत आहे. नुकतेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी त्यांच्या देशातील सर्व विमान कंपन्यांना अमेरिकेची विमान उत्पादक कंपनी बोईंगकडून (Boeing) विमानांची डिलिव्हरी घेणे थांबवण्याचे निर्देश दिले होते. चीनच्या या निर्णयामुळे बोईंगच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. ज्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला.
आतापर्यंत असा अंदाज लावला जात होता की चीनच्या या चालीमागे स्वतः शी जिनपिंग आहेत. परंतु सत्य काही वेगळेच आहे. 'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या (South China Morning Post) एका अहवालानुसार चीनने हा महत्त्वपूर्ण निर्णय एका रहस्यमय महिलेमुळे घेतला आहे. जी चीनला हवाई क्षेत्रातील बादशाह बनवण्याची क्षमता ठेवते. कोण आहे ही सीक्रेट लेडी?
advertisement
कोण आहे चीनची 'सीक्रेट लेडी'?
ज्या महिलेबद्दल सध्या जगभरात चर्चा आहे तिचे नाव आहे झाओ चुनलिंग (Zhao Chunling). झाओ चुनलिंग सध्या अमेरिकेच्या बोईंगला तगडी टक्कर देणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहेत. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार झाओ चुनलिंग यांनी 1991 मध्ये चीनच्या शानक्सी प्रांतातील एका सैन्य-समर्थित विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे आणि आज त्या चीनच्या सर्वात महत्त्वाकांक्षी विमान प्रकल्पांपैकी एक असलेल्या C929 च्या चीफ डिझायनर (Chief Designer) आहेत. असा दावा केला जात आहे की हे विमान बोईंग आणि एअरबस (Airbus) सारख्या दिग्गजांना आव्हान देण्यासाठी तयार केले जात आहे.
advertisement
अमेरिकेचा सुरुवातीपासूनच विरोध
अहवालानुसार झाओ यांचे शिक्षण चीनच्या नॉर्थवेस्टर्न पॉलीटेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये (Northwestern Polytechnical University) झाले आहे. हे तेच विद्यापीठ आहे ज्याला अमेरिकेने लष्करी संबंधांमुळे अनेक वेळा आपल्या निर्बंध यादीत (Sanctions List) टाकले आहे. शिक्षणानंतर झाओ यांनी लुओयांग येथील एका संरक्षण संशोधन संस्थेत (Defense Research Institute) तब्बल 18 वर्षे काम केले. ही संस्था ड्रोन आणि विमानांसाठी सेन्सर्स (Sensors), डिस्प्ले (Display) आणि कमांड टेक्नोलॉजी (Command Technology) विकसित करते.
advertisement
2009 पासून विमान निर्मितीच्या मिशनवर
साल 2009 मध्ये चीनने स्वतःची विमान उत्पादन कंपनी 'कोमॅक' (Comac) स्थापन केली आणि याच वेळी झाओ यांना एक नवीन आणि महत्त्वाकांक्षी मिशन मिळाले – C909 आणि C919 सारख्या प्रवासी विमानांचे डिझाइन तयार करणे. त्यांनी केवळ या विमानांचे डिझाइनच तयार केले नाही. तर कॉकपिटचे इंटेलिजेंट सिस्टीम (Intelligent System), डिजिटल डिस्प्ले (Digital Display) आणि पायलट अलर्ट सिस्टीम (Pilot Alert System) यांसारखे नविन शोध लावले. जे बोईंग 737 आणि एअरबस A320 सारख्या मॉडेलला टक्कर देण्यास सक्षम होते.
advertisement
कोविडही रोखू शकला नाही
जेंव्हा संपूर्ण जग कोरोना महामारीमुळे ठप्प झाले होते. तेव्हा झाओ आणि त्यांच्या टीमने C919 च्या आंतरराष्ट्रीय बेंचमार्किंगवर (International Benchmarking) रात्रंदिवस काम केले. याच प्रयत्नांचे फळ म्हणून मे 2023 मध्ये C919 ने आपली पहिली व्यावसायिक (Commercial) उड्डाण भरले.
आज झाओ चुनलिंग C929 नावाच्या मोठ्या आकाराच्या (Wide-body) विमानाची लीड डिझायनर आहेत. हे विमान एकाच वेळी 440 प्रवाशांना 12,000 किलोमीटरपर्यंत घेऊन जाऊ शकते. या विमानाचा पहिला प्रोटोटाइप 2027 पर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते जर चीनने हे विमान यशस्वीरित्या तयार केले. तर ते बोईंग 787 सारख्या विमानांना थेट आव्हान देऊ शकेल. चीनच्या या 'सीक्रेट लेडी'ने अमेरिकेला आणि बोईंगला मोठा धक्का दिला आहे हे निश्चित.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 20, 2025 3:20 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
चीनच्या 'सीक्रेट लेडी'च्या खेळीने अमेरिका हादरली; प्रोजेक्ट C929ने पायाखालची जमीन सरकली, धाकधूक वाढली


