5 दिवस ऑफिसला या नाहीतर घरी जा! ऑफिसचा आदेश, कर्मचाऱ्यांचं वाढलं टेन्शन

Last Updated:

जे कर्मचारी पाच दिवस ऑफिसला येऊ शकणार नाहीत त्यांनी कायमचं घरी जावं असं सरळ कंपनीच्या CEO कडून सांगण्यात आलं आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
कोरोनामुळे जगभरात वर्क फ्रॉम होम कल्चर सुरू झालं. मात्र हळूहळू कोव्हिड कमी झाला तशी परिस्थिती पूर्ववत होऊ लागली. मात्र काही कंपन्यांनी अजूनही कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होमचा निर्णय कायम ठेवला. काही कंपन्यांनी फ्लेक्झिबल ठेवण्यावर भर दिला. तर काही कर्मचारी याचा गैरफायदा घेऊ लागल्याने अखेर कंपन्यांनी आपल्या पॉलिसीमध्ये बदल केले आहेत.
आजही बऱ्याच कंपन्यांमध्ये अॅडजेस्टमेंट किंवा काही कारणास्तव वर्क फ्रॉम होमची सुविधा कर्मचारी घेतात. मात्र एका ई कॉमर्स कंपनीमध्ये अशी परिस्थिती आल्यानंतर कठोर पाऊल उचललं आहे. प्रसिद्ध ई कॉमर्स कंपनीने नुकतेच एक अधिसूचना काढून कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे.
जे कर्मचारी पाच दिवस ऑफिसला येऊ शकणार नाहीत त्यांनी कायमचं घरी जावं असं सरळ कंपनीच्या CEO कडून सांगण्यात आलं आहे. अमेझॉन कंपन्या CEO ने कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा विक केला असून हे पाच दिवस तुम्हाला ऑफिसमधून काम करावं लागेल असं सांगितलं. ज्यांना हे जमणार नाही त्यानी घरी जावं असंही त्यांनी म्हटलं आहे.
advertisement
अमेझॉननं आपल्या पॉलिसीमध्ये काही बदल केले आहेत. हे बदल ज्या कर्मचाऱ्यांना मान्य नाहीत ते घरी जाऊ शकतात अशी ताकीद त्यांनी दिली. जे कर्मचारी या वातावरणात या पॉलिसोबत काम करू शकत नाही त्यांच्यासाठी बाहेर इतर कंपन्या आहेत. त्यांनी तिथे जावं अशा लोकांची इथे गरज नाही असंही अमेझॉन क्लाउडचे CEO मॅट गार्मन म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
5 दिवस ऑफिसला या नाहीतर घरी जा! ऑफिसचा आदेश, कर्मचाऱ्यांचं वाढलं टेन्शन
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement