लहान मुलीशी शरीरसंबंध ठेवत होते, ट्रम्प यांच्या नेत्यावर गंभीर आरोप, कॅबिनेटवर टांगती तलवार
- Published by:Suraj
Last Updated:
मॅट गेट्ज यांना अटॉर्नी जनरल म्हणून नियुक्ती देण्यावरून वाद निर्माण झालाय. गेट्ज यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि ड्रग्जचा वापर याप्रकरणी गंभीर आरोप आहेत.
वॉशिंग्टन : अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे पदभार स्वीकारण्याआधीच वादाला तोंड फुटलं आहे. ट्रम्प आधीच एका सेक्स स्कँडलमध्ये आरोपी आहेत. यातच त्यांनी सरकारमध्ये काही लोकांची मंत्रिपदासाठी शिफारस केलीय. यापैकी काही लोकांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत ट्रम्प यांनी शिफारस केलेल्या लोकांची नियुक्ती करण्यास सीनेट मंजुरी देणार का असा प्रश्न आहे. मॅट गेट्ज यांना अटॉर्नी जनरल म्हणून नियुक्ती देण्यावरून वाद निर्माण झालाय.
मॅट यांच्या अनुभवाच्या मुद्द्यावरून त्यांच्या नियुक्तीबद्दल सुरुवातीपासून प्रश्न विचारले जात आहेत. पण डोनाल्ड ट्रम्प हे मॅट यांच्या नियुक्तीवर ठाम आहेत. त्यातच रिपब्लिकन पार्टीचे नेते आणि सीनेटर्सनी मॅट गेट्ज यांच्या नियुक्तीला मंजुरी देणार नसल्याचंही म्हटलंय. ट्रम्प यांच्या या नियुक्तीला मंजुरी देण्यासाठी सीनेटमधील किमान ५१ सदस्यांचा पाठिंबा असायला हवा.
येत्या काळात गेट्ज यांच्या नियुक्तीवरून सीनेटमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय की कॅबिनेटमध्ये गेट्ज हे सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहेत. गेट्ज हे ज्या विभागाचे हेड असतील त्यात ४० पेक्षा जास्त संस्था आणि १.१५ लाखांहून जास्त जण काम करतात.
advertisement
गेट्ज यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि ड्रग्जचा वापर याप्रकरणी गंभीर आरोप आहेत. त्यांच्याविरुद्ध चौकशीही सुरू आहे. गेट्ज यांनी ट्रम्प यांच्यासोबत प्रचारासाठी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. गेट्ज यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांच्यावर अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप आहे. त्या आरोपातही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. गेट्ज यांच्यावर आरोप करणाऱ्या दोन महिलांच्या वकिलांनी शुक्रवारी म्हटलं की, त्यांच्या एका क्लायंटने हे दाखवलं होतं की, खासदार एका अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवत आहेत.
advertisement
ट्रम्प यांच्या आगामी सरकारमध्ये गेट्ज एकटे असे नाहीत की ज्यांच्यावर असे आरोप झाले आहेत. ट्रम्प यांनी पीट हेगसेग यांची संरक्षण मंत्रीपदासाठी शिफारस केलीय. पीट यांच्यावरही २०१७ मध्ये लैंगिक शोषणाचे आरोप होते. फॉक्स न्यूजचे माजी एंकर असलेल्या पीट यांनीही आरोप फेटाळले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचे माजी उमेदवार रॉबर्ट एफ केनेडी ज्युनिअर यांना आरोग्य मंत्री तर तुलसी गबार्ड यांना गुप्तचर विभागाचे संचालक नियुक्त केलंय. यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2024 3:37 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
लहान मुलीशी शरीरसंबंध ठेवत होते, ट्रम्प यांच्या नेत्यावर गंभीर आरोप, कॅबिनेटवर टांगती तलवार


