डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा WWF मध्ये मित्राचीच केली होती धुलाई, आता करणार का मदत?
- Published by:sachin Salve
Last Updated:
यामध्ये ते एकमेकांशी भांडायचे. हे भांडण फक्त चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी होतं. हा सेगमेंट खूप लोकप्रिय झाला होता.
मुंबई: संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. माजी राष्ट्रपती आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना बहुमत मिळालं आहे. त्यांनी अटीतटीच्या लढाईत विद्यमान उपराष्ट्रपती आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. ट्रम्प यांच्या विजयामागे अनेक कारणं आहेत. विन्स मॅकमेहन ही व्यक्तीदेखील विशेष आहे. या व्यक्तीमुळे संपूर्ण जगाला अगोदर डब्ल्यूडब्ल्यूएफ आणि नंतर डब्ल्यूडब्ल्यूईचं वेड लागलं. विन्स यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. असं असूनही त्यांचा अमेरिकेच्या राजकारणावर बराच प्रभाव आहे. त्यांची आणि डोनाल्ड ट्रम्प यांची घट्ट मैत्री आहे.
राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ट्रम्प एक बिझनेसमन होते. वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंटच्या हॉल ऑफ फेममध्ये सेलेब्रिटी विंग हा एक लोकप्रिय भाग होता. ट्रम्प बराच काळ त्याचा भाग होते. ते आणि विन्स एकत्र काम करत होते. टेलिव्हिजन सेगमेंटच्या बाहेरदेखील हे दोन्ही बिझनेसमन अतिशय जवळचे मित्र आहेत. त्यामुळेच ट्रम्प सुखात असोत किंवा दु:खात डब्ल्यूडब्ल्यूईचे संस्थापक विन्स मॅकमेहन कायम त्यांच्यासोबत असतात.
advertisement
डब्ल्यूडब्ल्यूईला प्रसिद्ध करण्यासाठी व्यवस्थापन अनेक वादग्रस्त डावपेच अवलंबत आहे. एकदा टीआरपीच्या नावाखाली महागडी लिमोझिनचा स्फोट घडवून आणला गेला होता. त्यावेळी विन्स कारच्या आत असल्याचं व्हिज्युअलमध्ये दिसलं होतं. जेव्हा ही बातमी ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा चाहत्यांप्रमाणेच त्यांनाही धक्का बसला होता. गाडीत विन्स होते की नाही, याची खात्री करण्यासाठी त्यांनी व्हिन्सचे जावई ट्रिपल-एच यांना दोनदा कॉल केला होता. यावरून ट्रम्प आणि विन्स हे एकमेकांचे किती जिवलग मित्र आहेत, हे लक्षात येतं.
advertisement
अफाट संपत्तीचे मालक असलेले विन्स वेळोवेळी आपल्या मित्रावर पैशांच्या रूपाने प्रेमाचा वर्षाव करतात. या पैशांचं कोणतंही रेकॉर्ड नाही. एकदा वॉल स्ट्रीट जर्नलने अशी माहिती दिली होती, की 2007 ते 2009 दरम्यान विन्स यांनी डोनाल्ड ट्रम्प फाउंडेशनमध्ये 5 दशलक्ष डॉलर्स जमा केले होते. या व्यवहाराचं कोणतंही रेकॉर्ड नव्हतं. 2018मध्ये ट्रम्प यांनी हे फाउंडेशन विसर्जित केलं.
advertisement
जेव्हा डब्ल्यूडब्ल्यूई संघर्ष करत होतं, तेव्हा ट्रम्प आणि विन्स यांच्यातल्या 'बॅटल ऑफ द बिलियनेअर' स्टोरी लाइनची स्क्रिप्ट लिहिली गेली होती. यामध्ये ते एकमेकांशी भांडायचे. हे भांडण फक्त चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी होतं. हा सेगमेंट खूप लोकप्रिय झाला होता.
राष्ट्रपतिपदाच्या मागच्या निवडणुकीत जो बायडन यांच्याकडून ट्रम्प हरले. दुसरीकडे विन्स यांच्यावर बलात्कार, लैंगिक शोषण असे अनेक गंभीर आरोप झाले. असं असूनही दोन्ही मित्र एकमेकांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. जेनेल ग्रँट खटल्यामुळे विन्स यांना डब्ल्यूडब्ल्यूईमधलं आपलं पद सोडावं लागलं. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्याविरुद्ध 500 दशलक्ष डॉलर्सच्या नुकसानभरपाईचा नवीन खटला दाखल झाला आहे. अशा वेळी जवळचे मित्र ट्रम्प हे पुन्हा राष्ट्रपती होणं, हा त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2024 9:56 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा WWF मध्ये मित्राचीच केली होती धुलाई, आता करणार का मदत?


