Lahore blasts : पाकिस्तानवर डबल अटॅक, एअर स्ट्राईकच्या 24 तासानंतर साखळी बॉम्बस्फोटाने हादरलं लाहोर!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pakistan Lahore Multiple blasts : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर आता लाहोरमध्ये अनेक धमाके झाल्याची माहिती समोर आली आहे.
Lahore blasts Attack : इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करून 70 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अशातच आता भारत पाकिस्तान सीमेवर हालचाली वाढल्या असून लाहोरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताने केलेल्या हल्ल्याच्या 24 तासानंतर आता लाहोरमध्ये अनेक धमाके झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान मीडिया रिपोर्टनुसार, लाहोरमधील वॉल्टन रोडवर मोठे स्फोट आणि सायरन ऐकू आले आहेत. या हल्ल्याच्या मागे कुणाचा हात आहे? याची माहिती समोर आली नाही.
According to local sources in Lahore three explosion heard at Pak military airport in Walton area
Rescue firefighting vehicles reached the scene.
Developing story pic.twitter.com/gBmHIGmC4T
— OsintTV 📺 (@OsintTV) May 8, 2025
गुरुवारी सकाळी लाहोरमधील वॉल्टन रोडवर मोठ्या स्फोटांची मालिका ऐकू आली, असा दावा पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की ते स्फोटाचे स्वरूप आणि स्थान निश्चित करत आहेत. वॉल्टन विमानतळाजवळील लाहोरमधील गोपाळ नगर आणि नसीराबाद भागात वॉल्टन रोडवर अनेक स्फोट ऐकू आले. लोक घाबरून घराबाहेर पळाले आणि धुराचे लोट पाहिल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी मीडियामधून समोर आलेल्या माहितीनुसार, ड्रोन द्वारे हा हल्ला केला गेला आहे.
advertisement
लाहोर हवाई क्षेत्र बंद
भारताकडून झालेल्या कारवाईनंतर हवाई हल्ल्याच्या भीतीमुळे पाकिस्तान सरकार मध्यरात्री पुन्हा जागे झाले आणि रात्री उशिरा लाहोर आणि इस्लामाबाद विमानतळांवरील आपलं हवाई क्षेत्र बंद केलं आहे. बुधवारी पाकिस्तानने देशभरातील हवाई क्षेत्र 48 तासांसाठी बंद ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र, नवीन आदेशानुसार कराचीचे हवाई क्षेत्र बंद केलं नाही.
advertisement
लाहोर कॅन्टोन्मेंटकडे जाणाऱ्या वॉल्टन रोडवर ड्रोन हल्ल्यानंतर लाहोरमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय. लोक घाबरून रस्त्यावर उतरले. असीम मुनीरच्या जिहादी धोरणांमुळे पाकिस्तानच्या रस्त्यांवर युद्धाला आमंत्रण मिळाले आहे, अशी चर्चा सध्या पाकिस्तानमध्ये सुरू आहे.
दरम्यान, भारताने केलेल्या लष्करी कारवाईअंतर्गत भारतीय हवाई दल आणि लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनांचे अड्डे उद्ध्वस्त झाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 08, 2025 8:53 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Lahore blasts : पाकिस्तानवर डबल अटॅक, एअर स्ट्राईकच्या 24 तासानंतर साखळी बॉम्बस्फोटाने हादरलं लाहोर!


