भूकंपाचे तीव्र धक्के की अणुचाचणी? धक्क्यांनी हादरलं इराण, जगभरात खळबळ
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये अडकलेल्या इराणच्या गेराश भागात ४.३ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. USGS नुसार हा Tectonic Activityमुळे झाला आहे.
इराणवर आता नवीन संकट आलं आहे. अमेरिका विरुद्ध इराण संघर्ष सुरू असताना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाच्या धक्क्यांनी शहर हादलं. याची तीव्रता 4 रिश्टर स्केलपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळाली आहे.
एकीकडे अमेरिका आणि इस्रायल क्षेपणास्त्र हल्ला करत आहेत. आता निसर्गानेही इराणला मोठा दणका दिला. मंगळवारी दुपारी दक्षिण इराणचा परिसर भीषण भूकंपाच्या धक्क्याने हादरला. आधीच बॉम्बस्फोट आणि हवाई हल्ल्यांच्या सावटाखाली असलेल्या इराणमध्ये या भूकंपाने प्रचंड दहशत निर्माण केली असून, नागरिकांमध्ये पळापळ सुरू झाली आहे.
अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण इराणमधील गेराश भागात ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. जमिनीच्या १० किलोमीटर खाली या भूकंपाचे केंद्र होते. काही स्थानिक रिपोर्ट्समध्ये हा भूकंप ४.५ तीव्रतेचा असल्याचेही सांगण्यात येत आहे. फार्स प्रांतात याचे तीव्र धक्के जाणवले असून, आधीच युद्धाच्या तणावात असलेल्या लोकांनी घराबाहेर धाव घेतली.
advertisement
इराणमध्ये एका बाजूला इस्रायलचे हल्ले सुरू असतानाच हा भूकंप आल्याने सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेकांनी हा नैसर्गिक भूकंप नसून इराणने अणुचाचणी केली का असा संशय व्यक्त केला आहे. मात्र, USGS ने स्पष्ट केले आहे की, हा भाग सिस्मिक ॲक्टिव्ह झोनमध्ये येत असल्याने Tectonic Activity असू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 1:40 PM IST










