Yahya Sinwar : इस्रायलने सर्वात मोठ्या शत्रूला उडवलं, बायडेन म्हणाले, हा 'शुभ दिन'
- Published by:Suraj
Last Updated:
Yahya Sinwar Killed : आयडीएफने गाझा पट्टीत हमासच्या तळांना टार्गेट करत एअरस्ट्राइक केला. यात सिनवारसह हमासच्या तिघांचा मृत्यू झाला.
बैरूत : इस्रायल आणि हमास यांच्या युद्धात गुरुवारी इस्रायलच्या लष्कराला मोठं यश मिळालं. इस्रायल डिफेन्स फोर्सने हमासचा प्रमुख याह्या सिनवारला ठार केलं. याह्या सिनवारच्या मृत्यूवर अमेरिकेकडून प्रतिक्रिया देण्यात आलीय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी म्हटलं की, सिनावरचा खात्मा होणं हे इस्रायल आणि जगासाठी एक शुभ दिवस आहे.
ज्यो बायडेन यांनी म्हटलंय की, सकाळी इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यात हमास प्रमुखाला ठार केल्याचं सांगण्यात आलं. हा इस्रायल आणि अमेरिकेसह संपूर्ण जगासाठी शुभ दिवस आहे.
Hamas leader Yahya Sinwar is dead.
This is a good day for Israel, for the United States, and for the world.
Here’s my full statement. pic.twitter.com/cSe1czhd9s
— President Biden (@POTUS) October 17, 2024
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आयडीएफने गाझा पट्टीत हमासच्या तळांना टार्गेट करत एअरस्ट्राइक केला. यात सिनवारसह हमासच्या तिघांचा मृत्यू झाला. सिनवारचा मृत्यू झाल्याची खात्री डीएनएच्या आधारे केली. सिनवार हा इस्रायलवर ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या रॉकेट हल्ल्यांचा सूत्रधार मानलं जातं. यानंतरच मिडल ईस्टमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
हमाससोबत गाझात युद्ध सुरू झाल्यानंतर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत हमास आणि लेबनॉनमधील अनेक कमांडर्सचा मृत्यू झाला आहे. हिजबुल्ला या युद्धात हमासच्या बाजूने इस्रायलवर हल्ले करत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 18, 2024 8:34 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Yahya Sinwar : इस्रायलने सर्वात मोठ्या शत्रूला उडवलं, बायडेन म्हणाले, हा 'शुभ दिन'


