Iran War: इराणकडून जबर मार, आयर्न डोमची हवा निघाली! अखेर हतबल इस्रालयने अमेरिकेसमोर हात पसरले
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Iran Israel Conflict : युद्ध सुरू होताच काहीच दिवसात इराण शरणागती पत्करेल असा अंदाज अमेरिका-इस्रायलचा होता. मात्र, इराणकडून कडवा प्रतिकार सुरू आहे. इस्रायलचा आयर्न डोमही इराणच्या माऱ्यासमोर निष्प्रभ ठरत आहे. अशातच आता इस्रायलने अमेरिकेसमोर मदतीसाठी हात पसरले आहेत.
तेल अवीव/वॉशिंग्टन: अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात युद्ध सुरू करून १५ दिवस झाले. आज १६ व्या दिवशीदेखील दोन्ही बाजूने हल्ले सुरू आहेत. युद्ध सुरू होताच काहीच दिवसात इराण शरणागती पत्करेल असा अंदाज अमेरिका-इस्रायलचा होता. मात्र, इराणकडून कडवा प्रतिकार सुरू आहे. इस्रायलचा आयर्न डोमही इराणच्या माऱ्यासमोर निष्प्रभ ठरत आहे. अशातच आता इस्रायलने अमेरिकेसमोर मदतीसाठी हात पसरले आहेत.
इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध वेगळ्याच वळणावर आले आहे. तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रांची कमतरता महासत्तांची गणिते बिघडवू शकते. इराणकडून होणाऱ्या सततच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इस्रायलची जगप्रसिद्ध हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defence System) आता दबावाखाली आली आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलकडे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे रोखणाऱ्या 'इंटरसेप्टर'ची (क्षेपणास्त्र-रोधक) गंभीर टंचाई निर्माण झाली आहे.
इराणची 'क्लस्टर मिसाईल्स' ठरतायत डोकेदुखी
advertisement
Semafor च्या रिपोर्टनुसार, इराणने आता आपल्या क्षेपणास्त्रांमध्ये 'क्लस्टर म्युनिशन'चा वापर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानामुळे एकाच क्षेपणास्त्रातून अनेक छोटे छोटे बॉम्ब पडतात, ज्यांना हवेतच रोखणे इस्रायलच्या 'ॲरो-२' आणि 'ॲरो-३' प्रणालीसाठी आव्हानात्मक ठरत आहे. एका इराणच्या मिसाईलला रोखण्यासाठी इस्रायलला अनेक इंटरसेप्टर्स वापरावे लागत असल्याने त्यांचा साठा वेगाने संपत चालला आहे.
८२६ दशलक्ष डॉलर्सचे आपत्कालीन बजेट
advertisement
शस्त्रास्त्रांची ही भीषण टंचाई भरून काढण्यासाठी इस्रायल सरकारने २.६ अब्ज शेकेल्स (सुमारे ८२६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) इतका अवाढव्य आपत्कालीन निधी मंजूर केला आहे. या निधीचा वापर प्रामुख्याने शस्त्रास्त्रांचे पुनर्भरण आणि 'ॲरो' प्रणालीसाठी लागणारी क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासाठी केला जाणार आहे. गेल्या वर्षीच्या संघर्षामुळे आधीच साठा कमी असताना, आताच्या युद्धाने इस्रायलच्या संरक्षण साठ्यावर मोठा ताण निर्माण केला आहे.
advertisement
अमेरिकेलाही सतावतेय भीती...
एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलकडे क्षेपणास्त्र-रोधक (Interceptors) शस्त्रास्त्रांची कमतरता भासू शकते, याची कल्पना अमेरिकेला गेल्या अनेक महिन्यांपासून होती. अमेरिकेला या परिस्थितीची आधीच खात्री होती आणि त्यासाठी ते पूर्णपणे तयारही होते. मात्र, त्या अधिकाऱ्याने हेदेखील स्पष्ट केले की, अमेरिकेच्या स्वतःच्या शस्त्रास्त्र साठ्यात कोणतीही कमतरता नसून त्यांची लष्करी क्षमता आजही भक्कम आहे.
advertisement
दरम्यान, अमेरिका आपला स्वतःचा हा शस्त्रास्त्र साठा इस्रायलला देणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. जर अमेरिकेने इस्रायलला ही मदत केली, तर त्याचा परिणाम अमेरिकेच्या स्वतःच्या राखीव साठ्यावर होऊ शकतो आणि त्यावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकन अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, आखाती क्षेत्रातील आपल्या लष्करी तळांच्या आणि सैनिकांच्या सुरक्षेसाठी अमेरिके कडे पुरेसा शस्त्रसाठा उपलब्ध आहे. तसेच, इस्रायल आपल्या शस्त्रास्त्रांची ही तूट भरून काढण्यासाठी आता इतर पर्यायांचा शोध घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Mar 15, 2026 1:27 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran War: इराणकडून जबर मार, आयर्न डोमची हवा निघाली! अखेर हतबल इस्रालयने अमेरिकेसमोर हात पसरले








