Israel Iran Conflict : इराणकडून रात्रभर झालेल्या हल्ल्याचे 10 मोठे अपडेट्स, तिसरं युद्ध होणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
इस्रायलमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून, वित्तहानी देखील झाली आहे. याचे परिणाम सोनं, शेअर मार्केट, तेल कंपन्यांवर दिसण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. इराणने रात्री उशिरा इस्रायलवर मिसाइल हल्ला केला. 150 मिसाइल्स इराणने इस्रायलवर सोडले. या हल्ल्यामुळे आणखी तणाव वाढला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर परिस्थिती चिघळली आहे. इस्रायलमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून, वित्तहानी देखील झाली आहे. याचे परिणाम सोनं, शेअर मार्केट, तेल कंपन्यांवर दिसण्याची शक्यता आहे.
नेतन्याहू यांची प्रतिक्रिया
इस्रायलवर हल्ला करुन इराणने मोठी चूक केली, त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी इशारा दिला आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
हल्ल्यानंतर इराणचा इस्रायलला इशारा
इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना इशारा देण्यात आला आहे. त्यांनी सोशल मीडियावर इशारा दिला आहे. इराण युद्धप्रिय नाही, पण इथल्या लोकांच्या हितासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्हाला हे पाऊल उचलावं लागत आहे. आमच्यासोबत संघर्ष करु नका, महागात पडेल.
advertisement
'तुम्ही इस्रायलला मदत केलीत तर...', समर्थन करणाऱ्या देशांना इराणकडून धमकी
इराणने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलचं समर्थन करणाऱ्या देशांना इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी धमकी दिली आहे. इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या देशांनी थेट हस्तक्षेप केल्यास त्यांना इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सशस्त्र दलांच्या शक्तिशाली हल्ल्याला सामोरे जावे लागेल. त्यामुळे त्या देशांनी या संघर्षात न पडणं योग्य आहे.
इराणने सांगितलं हल्ल्यामागचं कारण
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. हा हल्ला आम्ही स्वसंरक्षणासाठी केल्याचं इराणने म्हटलं आहे.
advertisement
कमला हॅरिस यांनी काय दिली प्रतिक्रिया?
राष्ट्रपदीपदासाठी अर्ज भरलेल्या उमेदवार कमला हॅरिस यांनी या हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मिडल इस्टमध्ये अस्थिरता करण्याची ताकद इराणकडे आहे. या भागांमध्ये खूप जास्त तणाव वाढला आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होणार आहे.
हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर इराणकडून हल्ला
इस्त्रायली सैन्याने टेलीग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की ते लेबनॉनमधील बेरूतमधील हिजबुल्लाच्या स्थानांवर हल्ले करत आहेत.
advertisement
शेअर मार्केटवरही परिणाम
मिडल ईस्टमध्ये वाढत्या तणावामुळे अमेरिकन शेअर बाजार लालमध्ये व्यवहार करत आहे. गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत. दुसरीकडे सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आशियातील शेअर मार्केटवरही होण्याची शक्यता आहे. आज गांधीजयंती निमित्ताने शेअर मार्केटला सुट्टी आहे. मात्र उद्या शेअर मार्केटवर याचा वाईट परिणाम दिसू शकतो.
इस्रायलमध्ये झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक इमारती, आणि वित्तहानीचं मोठं नुकसान झालं आहे. इराणने इस्रायलवर 400 हून अधिक मिसाइल डागले आहेत. रात्री उशिरा इराणने 150 हून अधिक मिसाइल डागले. यामध्ये इस्रायलचं मोठं नुकसान झालं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 02, 2024 7:20 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Israel Iran Conflict : इराणकडून रात्रभर झालेल्या हल्ल्याचे 10 मोठे अपडेट्स, तिसरं युद्ध होणार?


