advertisement

Israel Iran Conflict : इस्रायल म्हणजे शांततेसाठी कॅन्सर, इराण हल्ल्यावर किम जोंग संतापले, अमेरिकेचंही टेन्शन वाढवलं

Last Updated:

North Korea On Israel Iran War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याच्या प्लॅनला मंजुरी दिली आहे.तर, दुसरीकडे इराणवरील हल्ल्यानंतर उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन संतापले आहेत. उत्तर कोरियाच्या भूमिकेनंतर अमेरिकेसह जगाचं टेन्शन वाढणार आहे.

शांततेसाठी इस्रायल म्हणजे कॅन्सर, इराण हल्ल्यावर किम जोंग संतापले, अमेरिकेचंही टेन्शन वाढवलं
शांततेसाठी इस्रायल म्हणजे कॅन्सर, इराण हल्ल्यावर किम जोंग संतापले, अमेरिकेचंही टेन्शन वाढवलं
Israel Iran Conflict: इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात तिसऱ्या महायुद्धाचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याच्या प्लॅनला मंजुरी दिली आहे. मात्र, शेवटचा निर्णय घेण्याआधी त्यांनी इराणकडून अणू कार्यक्रमावर त्यांची अंतिम भूमिका काय असणार, याची माहिती घेतल्यानंतरच हल्ला करणार आहे. तर, दुसरीकडे इराणवरील हल्ल्यानंतर उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन संतापले आहेत. उत्तर कोरियाच्या भूमिकेनंतर अमेरिकेसह जगाचं टेन्शन वाढणार आहे.

इस्रायल हा शांततेसाठी लागलेला कर्करोग...

उत्तर कोरियाने म्हटले आहे की इस्रायल हा मध्य पूर्वेतील शांततेसाठी एक कर्करोग आहे आणि जगाची शांतता आणि सुरक्षितता बिघडवणारा मुख्य गुन्हेगार आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या प्रवक्त्याने इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. हा हल्ला मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे म्हटले. यामुळे अस्थिर मध्य पूर्वेत व्यापक युद्ध होऊ शकते. कोरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेनुसार, देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने गुरुवारी एक निवेदन जारी केले. उत्तर कोरियाने देश इस्रायलने इराणच्या नागरिकांवर, अणु आणि ऊर्जा केंद्रांवर केलेल्या लष्करी हल्ल्यांबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत तीव्र निषेध केला आहे. प्रवक्त्याने सांगितले की इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांची हत्या हा 'मानवतेविरुद्ध अक्षम्य गुन्हा' आहे. त्यांनी इस्रायलवर राज्य-पुरस्कृत दहशतवादाचा आरोप केला. इस्रायलच्या या दहशतवादी पावलामुळे या प्रदेशात व्यापक युद्धाचा धोका वाढत असल्याचा दावा त्यांनी केला.
advertisement

उत्तर कोरियाचा अमेरिका, युरोपीय देशांना इशारा

इराण-इस्रायल युद्धाच्या सुरुवातीपासून अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभे ठाकणार असल्याचे म्हटले जात होते. डोनाल्ड ट्रम्प हे इराणच्या फोर्डो भूमिगत युरेनियम समृद्धीकरण प्रकल्पावर हल्ला करू शकतात असे म्हटले जात आहे. इराण पूर्णपणे आत्मसमर्पण करावे आणि भविष्यात अणुबॉम्ब बनवू नये म्हणून त्याचे युरेनियम समृद्धीकरण थांबवावे अशी मागणी अमेरिकेने केली आहे. इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. इराणवर हल्ला केल्यास त्याची जबर किंमत अमेरिकेला मोजावी लागेल असा इशारा इराण सरकारने दिला आहे.
advertisement
उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'जगासमोरील सध्याची परिस्थिती हे सिद्ध करते की अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या पाठिंब्याने पुढे जाणारा इस्रायल मध्यपूर्वेतील शांततेसाठी कर्करोगासारखा आहे. इस्रायल हा जागतिक शांतता आणि सुरक्षितता बिघडवण्यात मुख्य दोषी आहे. त्यांच्याकडून युद्धखोरी केली जात असून दुसरीकडे इराणच्या कायदेशीर सार्वभौमत्वाच्या आणि स्वसंरक्षणाच्या अधिकाराच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, असेही उत्तर कोरियाने म्हटले.
advertisement

जगाचं टेन्शन वाढणार?

उत्तर कोरियानेदेखील आता इस्रायल, अमेरिकेविरोधात दंड थोपटले आहेत. चीन आणि रशियादेखील या दोन देशांच्याविरोधात आहेत. आता अमेरिकेने या युद्धात एन्ट्री केल्यास जागतिक पातळीवर अनेक घडामोडी घडण्याच्या शक्यता आहे. उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनीदेखील युद्धात सहभाग घेतल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. उत्तर कोरिया हा अण्वस्त्रधारी देश आहे. त्यामुळे उत्तर कोरियाच्या हालचाली वाढल्यास जगाला टेन्शन येण्याची शक्यता आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Israel Iran Conflict : इस्रायल म्हणजे शांततेसाठी कॅन्सर, इराण हल्ल्यावर किम जोंग संतापले, अमेरिकेचंही टेन्शन वाढवलं
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement