शरीराला बॉम्ब बांधून सुप्रीम कोर्टाबाहेर पोहोचला, पुढच्या क्षणी स्फोटांनी हादरलं ब्राझील, थरारक VIDEO
- Published by:Suraj
Last Updated:
Brazil supreme court blast : सुप्रीम कोर्टात प्रवेश करण्याचा प्रयत्न फसलेल्या एका व्यक्तीने इमारतीबाहेर स्फोट घडवून स्वत:ला संपवलं.
ब्राझिलिया : ब्राझीलमध्ये सुप्रीम कोर्टात प्रवेश करण्याचा प्रयत्न फसलेल्या एका व्यक्तीने इमारतीबाहेर स्फोट घडवून स्वत:ला संपवलं. अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं की, या घटनेनंतर न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांनी परिसर रिकामा केला. सर्व लोक बाहेर आले. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाकडून यासंदर्भात निवेदन जारी करण्यात आलंय. दिवसभऱाचं सेशन संपल्यानंतर सायंकाळी साडे सातच्या सुमारास दोन स्फोटाचे आवाज झाले.यानंतर सर्व न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे भवनातून बाहेर काढण्यात आले. या स्फोटाचे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी राजधानी ब्राझिलियातील एकाचा घटनास्थळी मृत्यू झाल्याचं सांगितलं. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. ब्राझीलच्या लेफ्टनंट गव्हर्नरननी सांगितलं की, संशयिताने आधी संसदेच्या पार्किंगमधील एका कारमध्ये स्फोटकं लावली होती. पण यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. स्पीकर ऑर्थर लिरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिओ यांनी कोणताही धोका होऊ नये यासाठी गुरुवारी संसद बंद ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार गुरुवारी दुपारपर्यंत सदन बंद ठेवण्यात आलं होतं.
advertisement
Two blasts near Brazil's Supreme Court, one dead #BRAZILBLAST pic.twitter.com/M35u30U0Aq
— Mahalingam Ponnusamy (@mahajournalist) November 15, 2024
ब्राझिलियातील थ्री पॉवर्स प्लाझामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर २० सेकंदाच्या अंतराने स्फोट झाले. या ठिकाणी सुप्रीम कोर्ट, संसद आणि राष्ट्रपती भवनासह ब्राझीलच्या मुख्य सरकारी इमारती आहेत. घटनेनंतर बराच वेळ या परिसरात गोंधळ होता.
advertisement
काही दिवसांपूर्वी ब्राझीलच्या मैसियो इथं रहिवाशी इमारतीत स्फोट झाला होता. यात १० वर्षीय मुलासह तिघांचा मृत्यू झाला होता तर पाच जण जखमी झाले होते. अग्निशमन विभागाने गुरुवारी याबाबत माहिती दिली. नागरिक सुरक्षा प्रवक्ते म्हणाले की, प्राथमिक तपासात अशी माहिती मिळाली की स्फोटाचे कारण एका अपार्टमेंटमध्ये सिस्टिममधून गॅस लीक हे होते. स्फोटानंतर लागलेल्या आगीत २ मजली इमारत जळून खाक झाली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2024 11:15 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
शरीराला बॉम्ब बांधून सुप्रीम कोर्टाबाहेर पोहोचला, पुढच्या क्षणी स्फोटांनी हादरलं ब्राझील, थरारक VIDEO


