बांगलादेशमधून आली मोठी बातमी; मोहम्मद युनुस यांचे काउंटडाउंन सुरू झाले, हंगामी सरकारचे मोजके दिवस शिल्लक
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Bangladesh News: बांगलादेशचे मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नासिर उद्दीन यांनी रविवारी एक मोठी घोषणा केली आहे. देशातील १३व्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात त्यांनी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
ढाका: बांगलादेशमधून गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ करणाऱ्या बातम्या येत आहेत. सत्ताबदलानंतर देशात हिंदू आणि अन्य धर्माच्या लोकांवर होणारे अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. या घटना रोखण्यासाठी मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकार फार प्रयत्न करताना दिसत नाही. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात बांगलादेशमधून एक मोठी अपडेट येत आहे. मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशमधील हंगामी सरकारचे आता काही महिनेच शिल्लक राहिले आहेत.
बांगलादेशचे मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नासिर उद्दीन यांनी रविवारी सुमारे 18 कोटी लोकांचे मतदान अधिकार पुन्हा बहाल करण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यांना आतापर्यंत स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांमध्ये भाग घेण्यापासून वंचित ठेवले गेले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांसाठी एका प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना नासिर उद्दीन म्हणाले की, निवडणूक आयोग (ईसी) या दीर्घकाळ चालत आलेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ठाम आहे. आपल्या नागरिकांना झालेल्या नुकसानीची वेदना कमी करायची आहे. आम्ही आमच्या वचनबद्धतेपासून मागे हटणार नाही, असे ते म्हणाले.
advertisement
शिर्डीत अख्खा देश येऊन फुकट जेवण करतोय- सुजय विखे
वोटर लिस्ट अपडेटसाठी घरोघरी डेटा गोळा करण्याची प्रक्रिया 20 जानेवारीपासून सुरू होईल, जी 13व्या राष्ट्रीय निवडणुकीची तयारी करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातो, असे द ढाका ट्रिब्यूनने म्हटले आहे.
आजपासून निकाल जाहीर होईपर्यंत ही एक मॅरेथॉन शर्यत आहे. आपले उद्दिष्ट, वचनबद्धता, आणि राष्ट्राशी दिलेले आश्वासन म्हणजे जगासमोर एक स्वतंत्र, निष्पक्ष आणि विश्वासार्ह निवडणूक सादर करण्याचे आहे असे उद्दीन म्हणाले.
advertisement
निवडणूक आयोगाने मागील निवडणुकांतील अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्याची योजना जाहीर केली आहे. या निवडणुकांमध्ये 2014, 2018, आणि 2024 मध्ये अवामी लीगच्या सत्तेखाली झालेल्या निवडणुका समाविष्ट आहेत. ज्या देशाच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त निवडणुकांपैकी मानल्या जातात. 21 नोव्हेंबर रोजी नव्याने स्थापन झालेल्या निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेवर लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी निवडणूक सुधारणांची अंमलबजावणी सुरू केली आहे.
advertisement
बांगलादेशमध्ये पुढील निवडणुका कधी होतील?
अंतरिम मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांनी ऑगस्टमध्ये शेख हसीना यांची जागा घेत कार्यवाहक सरकारची सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी संकेत दिले की राष्ट्रीय निवडणुका 2025च्या अखेरीस किंवा 2026च्या मध्यात होऊ शकतात.
16 डिसेंबर रोजी विजय दिवसाच्या भाषणात युनुस यांनी सांगितले की, निवडणुकांची वेळ मतदार यादीच्या अद्ययावत स्थितीवर अवलंबून आहे. याचवेळी, नासिर उद्दीन यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला म्हटले की, शेख हसीना यांची अवामी लीग आगामी निवडणुकांमध्ये न्यायालय किंवा सरकारद्वारे कोणताही बंदी आदेश न आल्यासच सहभागी होऊ शकते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 05, 2025 8:10 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
बांगलादेशमधून आली मोठी बातमी; मोहम्मद युनुस यांचे काउंटडाउंन सुरू झाले, हंगामी सरकारचे मोजके दिवस शिल्लक


