तुर्कस्तानचा करेक्ट कार्यक्रम, दहशतवादी पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशाला दिला पहिला झटका

Last Updated:

Turkey News: जेएनयूने तुर्कीच्या इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार पुढील आदेश येईपर्यंत तत्काळ स्थगित केला आहे. हा निर्णय तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यानंतर घेण्यात आला आहे.

News18
News18
इस्तंबूल/नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (JNU) तुर्कस्तानमधील इनोनू विद्यापीठासोबत केलेला सामंजस्य करार (Memorandum of Understanding - MoU) राष्ट्रीय सुरक्षा विचारात घेऊन पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. जेएनयू प्रशासनाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे आणि 'जेएनयू देशासोबत उभे आहे' असे स्पष्ट केले आहे.
जेएनयू आणि इनोनू विद्यापीठादरम्यान शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला होता. मात्र सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याने, विद्यापीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
हजारो कर्मचाऱ्यांना एका झटक्यात घरचा रस्ता; 6,800 अधिक कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
जेएनयू प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षा विचारात घेऊन, जेएनयू आणि इनोनू विद्यापीठ, तुर्किये यांच्यातील सामंजस्य करार पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. जेएनयू देशासोबत उभे आहे. या निर्णयामुळे दोन्ही विद्यापीठांमधील प्रस्तावित शैक्षणिक आदानप्रदान कार्यक्रम, संयुक्त संशोधन प्रकल्प आणि इतर सहकार्याचे उपक्रम तात्पुरते थांबले आहेत. जेएनयूने या निर्णयाची माहिती तुर्कस्तानच्या इनोनू विद्यापीठालाही कळवली असण्याची शक्यता आहे.
advertisement
राष्ट्रीय सुरक्षा कोणत्या विशिष्ट कारणांमुळे धोक्यात आली आहे किंवा या करारातील कोणत्या बाबींमुळे चिंता निर्माण झाली आहे, याबाबत जेएनयू प्रशासनाने अधिक तपशील दिलेला नाही. मात्र देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करणे ही विद्यापीठाची प्रथम जबाबदारी आहे, असे स्पष्ट संकेत या निर्णयाद्वारे देण्यात आले आहेत.
स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा; पाकिस्तानचे दोन तुकडे? भारताकडे केली मोठी मागणी
नुकत्याच झालेल्या भारत आणि पाकिस्तान संघर्षात तुर्कस्तानने पाकिस्तानची बाजू घेतली होती. इतक नाही तर त्यांनी पाकिस्तानला ड्रोन देखील पुरवले होते. दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानचे तुर्कस्तानने समर्थन केले होते. त्यानंतर भारतातील पर्यटन व्यवसायिकांनी तसेच अन्य व्यापाऱ्यांनी तुर्कस्तानवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानबद्दल भारतीयांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे.
advertisement
दरम्यान जेएनयू प्रशासनाने घेतलेला निर्णय भारत आणि तुर्कस्तान यांच्यातील शैक्षणिक संबंधांवर तात्पुरता परिणाम करू शकतो. दोन्ही देशांमधील विद्यापीठांमध्ये ज्ञान आणि संस्कृतीची देवाणघेवाण होणे महत्त्वाचे असले तरी राष्ट्रीय सुरक्षा आणि हित जपण्यासाठी कठोर पाऊले उचलणे आवश्यक असते, हेच या निर्णयातून दिसून येते.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
तुर्कस्तानचा करेक्ट कार्यक्रम, दहशतवादी पाकिस्तानला मदत करणाऱ्या देशाला दिला पहिला झटका
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement