हजारो कर्मचाऱ्यांना एका झटक्यात घरचा रस्ता; 6,800 अधिक कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; कारण वाचून भडका उडेल

Last Updated:

Microsoft Layoffs 2025: मायक्रोसॉफ्ट या मोठ्या टेक कंपनीने अचानकपणे जागतिक स्तरावर मोठी कामगार कपात जाहीर केली आहे. ज्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे टेक क्षेत्रात खळबळ माजली आहे.

News18
News18
मुंबई: टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने (Microsoft) जागतिक स्तरावर आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत सुमारे 3% घट करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे 6,800 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. कंपनीच्या पुनर्रचना योजनेचा भाग म्हणून हे पाऊल उचलले आहे. जूनमधील आकडेवारीनुसार मायक्रोसॉफ्टमध्ये 2 लाख 28 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. 2023 मध्ये 10,000 कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतरची ही सर्वात मोठी टाळेबंदी आहे.
सीएनबीसीच्या वृत्तानुसार ही कपात कर्मचाऱ्यांच्या कामाच्या मूल्यांकनाशी संबंधित नाही. मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, गतिशील बाजारपेठेत कंपनीला यशस्वीरित्या स्थान देण्यासाठी आवश्यक असलेल्या संघटनात्मक बदलांचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा; पाकिस्तानचे दोन तुकडे? भारताकडे केली मोठी मागणी
या नोकरकपातीचा परिणाम सर्व स्तरांवरील, टीम्स आणि प्रदेशांतील कर्मचाऱ्यांवर होणार आहे. जे कंपनीव्यापी बदलांना दर्शवते. मायक्रोसॉफ्टने कोणत्या पदांवरील कर्मचाऱ्यांची कपात केली जाईल हे स्पष्टपणे सांगितले नसले तरी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता), क्लाउड तंत्रज्ञान आणि बदलत्या ग्राहक मागणीमुळे निर्माण होणाऱ्या वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीत चपळ आणि स्पर्धात्मक राहण्याचे महत्त्व कंपनीने अधोरेखित केले आहे.
advertisement
बलुचिस्तानमधून आली मोठी बातमी, BLAने केली पाकिस्तानच्या प्याद्याची शिकार
मायक्रोसॉफ्टचे माजी कर्मचारी रॉन बकटन ज्यांना नुकतेच कामावरून कमी करण्यात आले. त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर एक भावनिक पोस्ट शेअर केली. ते 18 वर्षांहून अधिक काळ मायक्रोसॉफ्टमध्ये होते आणि त्यांनी सुमारे दशकभर TypeScript वर काम केले. त्यांनी लिहिले, मायक्रोसॉफ्टमधील 18 वर्षांच्या कारकिर्दीनंतर ज्यात TypeScript वर सुमारे दहा वर्षांचा समावेश आहे. दुर्दैवाने कर्मचारी कपातीच्या या फेरीत मला कामावरून काढण्यात आले. ते पुढे म्हणाले, नोकरी शोधायला सुरुवात करण्यापूर्वी मला काही दिवस लागतील. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार.
advertisement
मायक्रोसॉफ्टमधील एआयच्या संचालक म्हणून काम करणाऱ्या गॅब्रिएला डी क्विरोज या अभियंत्यानेही X वर सांगितले की,त्यांनाही अलिकडे झालेल्या कामगार कपातीत कमी करण्यात आले.
Layoffs.fyi या टेक कंपन्यांमधील कर्मचारी कपातीचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइटनुसार मायक्रोसॉफ्टच्या कामगार कपातीसह 2025 मध्ये आतापर्यंत 127 टेक कंपन्यांमधील एकूण 59,413 कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनी/
हजारो कर्मचाऱ्यांना एका झटक्यात घरचा रस्ता; 6,800 अधिक कर्मचाऱ्यांची हकालपट्टी; कारण वाचून भडका उडेल
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement