'मस्क वेडा झाला', ट्रम्प यांचा राग अनावर; दोघांच्या वादात रशियाने डाव साधला, विश्वास बसणार नाही अशी ऑफर दिली

Last Updated:

Elon Musk vs Donald Trump: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संघर्ष आता आंतरराष्ट्रीय रंग घेऊ लागला आहे. ट्रम्प यांनी मस्कला वेडा ठरवले असताना रशियाने त्याला राजकीय आश्रय देण्याची धक्कादायक ऑफर दिली आहे.

News18
News18
वॉशिंग्टन: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वाद आता केवळ राजकीय नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. ट्रम्प यांनी मस्क यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे की, 'मस्क वेडा झालाय, त्याच्याशी बोलण्यात रस नाही'. तर दुसरीकडे रशियाने मस्कला राजकीय आश्रय देण्याची तयारी दर्शवली आहे.
वादाची सुरुवात कशी झाली?
हे सगळं तेव्हा सुरू झालं, जेव्हा एलन मस्क यांनी ट्रम्प यांच्या 2024 च्या निवडणुकीसाठी मांडलेल्या खर्च व कर धोरणावर तीव्र टीका केली. मस्क यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ट्रम्प यांचा नविन खर्च विधेयक अमेरिकेवर आणखी कर्जाचा भार टाकेल. त्यावर ट्रम्प यांनी मस्कला "वेडा झालाय" म्हणत, संवाद तोडला.
युक्रेनच्या राजधानीत हाहाकार, मेट्रो ट्रेन उडवली, पुतिनचा घातक गेम
विशेष म्हणजे मस्क यांनी ट्रम्प यांच्या निवडणुकीसाठी 300 दशलक्ष डॉलर (सुमारे 2500 कोटी) इतकं मोठं योगदान दिलं होतं. मात्र आता ते म्हणत आहेत की, ट्रम्प माझ्या पाठिंब्याशिवाय पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊच शकत नव्हते.
advertisement
रशियाने खेळली चाल
यादरम्यान रशियाने संधी साधली. रशियन संसदेच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार समितीचे उपाध्यक्ष दिमित्री नोविकोव यांनी जाहीर केलं की, जर मस्क यांना राजकीय शरण हवं असेल, तर रशिया त्यासाठी तयार आहे. त्यांनी ही म्हटले की, मस्क वेगळाच खेळ खेळत आहेत, कदाचित त्यांना शरणाची गरजही नसेल.
त्याचवेळी रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी विनोदी शैलीत म्हटलं की, आवश्यकता भासल्यास आम्ही ट्रम्प आणि मस्क यांच्यात शांती चर्चा घडवून आणू.
advertisement
क्रेमलिनची ‘मौन भूमिका’
रशियाच्या क्रेमलिनने मात्र या संपूर्ण वादावर स्पष्ट मौन बाळगलं आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी म्हटलं की, हा अमेरिकेचा अंतर्गत मुद्दा आहे. आम्हाला यात काहीही बोलायचं नाही.
बाजारात खळबळ
या संघर्षाचा थेट परिणाम शेअर बाजारांवर देखील जाणवला आहे. मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे मस्क यांनी अमेरिकेतील महत्त्वाच्या अंतराळ कार्यक्रमाला बंद करण्याचा इशारा देखील दिला आहे. मस्क यांनी DOGE या सरकारी खर्च नियंत्रक संस्थेच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणांना "अमेरिकेसाठी आर्थिक आत्महत्या" असं संबोधलं आहे.
advertisement
आंतरराष्ट्रीय परिणाम
हा संघर्ष आता फक्त अमेरिकेपुरता मर्यादित न राहता रशिया सारख्या देशांची रसदर्शी भूमिका, आर्थिक उलथापालथ आणि राजकीय पडसादांमुळे एक जागतिक संघर्ष बनत चालला आहे. पुढे हे बघणं औत्सुक्याचं ठरेल की, हा संघर्ष समंजस्याकडे वळतो की आणखी भडकतो.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
'मस्क वेडा झाला', ट्रम्प यांचा राग अनावर; दोघांच्या वादात रशियाने डाव साधला, विश्वास बसणार नाही अशी ऑफर दिली
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement