Myanmar Earthquake: कुठे बिल्डिंग खचली तर कुठे अंगावर कोसळली, भूकंपाने हादरलं म्यानमार, नोएडापर्यंत जाणवले धक्के

Last Updated:

म्यानमारमध्ये 7.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्यामुळे थायलंड, दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादपर्यंत धक्के जाणवले. बँकॉकमध्ये इमारत कोसळली, लोक घाबरून बाहेर आले.

News18
News18
मुंबई: कुठे बिल्डिंग कोसळली तर कुठे अख्खी बिल्डिंग खचली आहे. पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवलं. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी म्यानमार, थायलंड हादरलं. या भूकंपाचे धक्के दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादपर्यंत जाणवले आहेत. बँकॉक, थायलंडमध्ये भूकंपांचे जोरदार धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल आहे. तर म्यानमार इथे 7.9 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार म्यानमार भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपामुळे बँकॉकमध्ये इमारत कोसळली. नमारमध्ये आज तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. अमेरिकेची भूगर्भ सर्वेक्षण संस्था (USGS) ने सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.7 इतकी नोंदवली होती. मात्र, भारताच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (National Center for Seismology) नंतर सुधारित माहिती देत भूकंपाची तीव्रता 7.0 सांगितली. हा शक्तिशाली भूकंप भारताच्या शेजारील देश म्यानमारमधील सागाइंग प्रांतात झाला. भूकंपाची खोली जमिनीपासून १० किलोमीटर खाली होती. USGS ने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी 12:50 (भारतीय वेळेनुसार सकाळी 11:20) च्या सुमारास सागाइंग शहराच्या 16 किलोमीटर वायव्येला 10 किलोमीटर खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
advertisement
दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरिदाबादमध्ये देखील भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे. या भागात तीव्रता कमी होती. मात्र यामुळे नोएडा आणि गाझियाबादमध्ये भीतीचं वातावरण आहे. फक्त म्यानमारच नाही, तर थायलंडची राजधानी बँकॉक येथेही भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. त्यामुळे लोक घाबरून कार्यालये आणि दुकाने सोडून रस्त्यावर आले.
advertisement
वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या नैऋत्येकडील युन्नान भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. बँकॉक शहरातील लोकांनी सांगितले की लोक खूप घाबरले होते आणि इमारतींमधून बाहेर पडले, तसेच अनेक स्विमिंग पूल मधून पाणी बाहेर पडायला लागले.बँकॉकमध्ये भूकंपाचा जोर इतका जास्त होता की लोक भीतीने थरथर कापत होते. उंच इमारती आणि कार्यालयांमधून लोक सुरक्षिततेसाठी बाहेर धावले. बँकॉक हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी एक आहे.
advertisement
भूकंप इतका शक्तिशाली होता की उंच इमारतींच्या वरच्या मजल्यांवरील स्विमिंग पूल तसेच इतर ठिकाणच्या पूलमधून पाणी बाहेर आले. भूकंपाच्या वेळी इमारती जोरदारपणे हलत होत्या, त्यामुळे अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य म्यानमारमध्ये, मोनीवा शहराच्या पूर्वेला सुमारे ५० किलोमीटर (३० मैल) अंतरावर होता.
advertisement
आता प्रश्न येतो की भूकंप का येतात?
भूकंप वैज्ञानिकांच्या मते, आपली पृथ्वीची पृष्ठभाग मुख्यत्वे सात मोठ्या आणि अनेक लहान टेक्टोनिक प्लेट्सनी बनलेली आहे. या प्लेट्स सतत हालचाल करत असतात आणि बऱ्याचदा एकमेकांवर आदळतात. या टक्करीमुळे प्लेट्सचे कोपरे वाकतात आणि जास्त दाब आल्यामुळे त्या तुटतात सुद्धा. अशा स्थितीत, खाली तयार झालेली ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि हीच ऊर्जा जेव्हा जमिनीतून बाहेर येते, तेव्हा भूकंप येतो.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Myanmar Earthquake: कुठे बिल्डिंग खचली तर कुठे अंगावर कोसळली, भूकंपाने हादरलं म्यानमार, नोएडापर्यंत जाणवले धक्के
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement