PM मोदींच्या शिरपेचात मानाचा तुरा, क्वीन एलिजाबेथनंतर असा सन्मान मिळवणारे दुसरी व्यक्ती
- Published by:Suraj
Last Updated:
नायजेरियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव केला. याआधी नायजेरियाने फक्त क्वीन एलिजाबेथ यांनाच हा पुरस्कार दिला होता.
अबुजा : पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असून ते तीन देशांना भेट देणार आहेत. यात ते सर्वात आधी नायजेरियाला पोहोचले आहेत. तिथून ब्राझील आणि गयानात जाणार आहेत. नायजेरियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव केला. याआधी नायजेरियाने फक्त क्वीन एलिजाबेथ यांनाच हा पुरस्कार दिला होता. त्यांना १९६९ मध्ये या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
नायजेरियाने पंतप्रधान मोदींना द ग्रँड कमामंडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींना मिळणारा हा १७ वा पुरस्कार आहे. याआधी १६ देशांनी त्यांचे सर्वोच्च पुरस्कार मोदींना दिले आहेत. पंतप्रधान नायजेरियात पोहोचल्यानंतर म्हणाले राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून पोहोचले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर म्हटलं की, पंतप्रधान मोदी अबुजा इथं पोहोचले आहेत. मंत्री न्येसोम एजेनवो वाइक यांनी स्वागत केलं. त्यांना अबुजा शहराची 'किल्ली' भेट दिली. परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे काही फोटो शेअर केले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी नायजेरियाचे राष्ट्रपती टिनुबु यांनी पोस्ट केलेलेल्या ट्विटला उत्तर दिलंय. त्यात टिनुबू यांनी म्हटलं की, आपल्या द्विपक्षीय चर्चेचा उद्देश दोन्ही देशातील धोरणात्मक भागिदीरी वाढवणं आणि महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवणं आहे.
advertisement
नायजेरियाच्या राष्ट्रपतींच्या पोस्टला उत्तर देताना मोदींनी म्हटलं की, धन्यवाद राष्ट्रपती टिनुबू, नुकताच नायजेरियात पोहोचलो. इथल्या स्वागताबद्दल आभारी आहे. आपल्या देशांमधील संबंध आणखी भक्कम व्हावेत ही इच्छा आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2024 1:47 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
PM मोदींच्या शिरपेचात मानाचा तुरा, क्वीन एलिजाबेथनंतर असा सन्मान मिळवणारे दुसरी व्यक्ती


