टँकरमध्ये स्फोट करुन चीनी इंजिनियर्स आणि गुंतवणूकदारांना उडवलं, कराची एअरपोर्टजवळ दहशतवाद्यांचा हल्ला
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Pakistan Blast: भीषण स्फोटानं हादरलं कराची एअरपोर्ट, 3 जणांचा मृत्यू, पोलिसांसह 17 जखमी
कराची : आधीच आपल्या कारनाम्यांमुळे जगभरात चर्चेत असलेल्या पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कराची एअरपोर्टजवळ रविवारी रात्री उशिरा स्फोट झाला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 हून अधिक लोक जखमी आहेत. स्फोटांनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या स्फोटामुळे कराची एअरपोर्ट आणि आसपासच्या परिसरात तणावाचं वातावरण होतं. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार रात्री उशिरा एअरपोर्टजवळ स्फोटाचे मोठे आवाज आले. त्यानंतर नेमकं काय घडलं ते पाहण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
एअरपोर्टजवळ आग आणि धुराचे लोळ दिसत होते. एअरपोर्टच्या बरोबर बाहेर एका टँकरमध्ये हा स्फोट घडवून आणण्यात आला. आतापर्यंत झालेल्या स्फोटातला हा सर्वात भयंकर आणि मोठा स्फोट असल्याचं मानलं जात आहे. बलूच लिबरेशन आर्मीने या स्फोटाची जबाबदारी घेतली आहे. वेहिकल बॉर्न इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइसचा वापर करुन स्फोट घडवून आणल्याचा दावा त्यांनी केला.
advertisement
#WATCH | At least three foreign nationals died while 17 others sustained injuries in a huge explosion near Jinnah International Airport, Karachi, reports Pakistan's Geo News.
(Video: Reuters) pic.twitter.com/qrJdStV9F7
— ANI (@ANI) October 7, 2024
चीनचे इंजिनियर आणि गुंतवणूकदार यांना टार्गेट करण्यासाठी हा स्फोट घडवून आणण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की त्याची झळ पोलीस अधिकाऱ्यांनाही बसली आहे. तेलाच्या टँकरमध्ये स्फोट घडवून आणल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पाकिस्तानच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2024 8:05 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
टँकरमध्ये स्फोट करुन चीनी इंजिनियर्स आणि गुंतवणूकदारांना उडवलं, कराची एअरपोर्टजवळ दहशतवाद्यांचा हल्ला


