डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर पीएम मोदींची खास पोस्ट, म्हणाले अभिनंदन मित्रा....
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विजयानंतर आता सर्वस्तरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे. अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून डोनाल्ड ट्म्प यांचे कौतुक केले आहे.
Donald Trump Victory : अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बहूमत गाठत डेमोक्रॅटीक पक्षाच्या कमला हॅरीस यांचा पराभव केला आहे. ट्रम्प यांच्या या विजयानंतर आता सर्वस्तरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे. अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून डोनाल्ड ट्म्प यांचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करून डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक केले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल माझ्या मित्राचे मनापासून अभिनंदन, तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळातील यशाचा आधार घेत असताना, मी भारत-यूएस व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आमच्या सहकार्याचे नूतनीकरण करण्यास उत्सुक आहे. आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करूया, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
advertisement
Heartiest congratulations my friend @realDonaldTrump on your historic election victory. As you build on the successes of your previous term, I look forward to renewing our collaboration to further strengthen the India-US Comprehensive Global and Strategic Partnership. Together,… pic.twitter.com/u5hKPeJ3SY
— Narendra Modi (@narendramodi) November 6, 2024
advertisement
दरम्यान या विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडातील पाम बीच इथं समर्थकांशी संवाद साधला. यावेळी अमेरिकेसाठी हे सुवर्णयुग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंतचं हे सर्वात मोठं राजकीय आंदोलन आहे. आम्ही आपल्या देशाला पुन्हा एकदा व्यवस्थित करण्यासाठी मदत करू. देशाला मदतीची गरज आहे. सीमा नीट करू. आज आपण इतिहास घडवला आहे.
advertisement
डोनाल्ड ट्रम्प यांनी सुवर्णयुग सुरू कऱण्याची शपथ घेताना म्हटलं की, हे एक असं आंदोलन होतं जे याआधी कधीच कुणी पाहिलं नाही. खरं सांगायचं तर मला वाटतं की आतापर्यंतचं हे सर्वात मोठं राजकीय आंदोलन होतं. या देशात यापेक्षा मोठं कधी काही झालं नसावं.
आम्ही आपल्या देशाची मदत करणार आहे. आपल्याकडे एक असा देश आहे ज्याला खूप मदतीची गरज आहे. आपण असे अडथळे पार केले ज्याचा कुणीही विचार केला नव्हता. आता हे स्पष्ट आहे की आपण विजय मिळवला आहे असंही ट्रम्प म्हणाले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2024 2:36 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर पीएम मोदींची खास पोस्ट, म्हणाले अभिनंदन मित्रा....


